औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे आज शिक्षक दिनानिमित्त अभ्यासिकेला सुरुवात


मावळ मराठा न्यूज़ पिम्परी ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड येथे आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशिक्षणार्थींना अभ्यासासाठी जागेची उपलब्धता व्हावी , वेळेचा सदूपयोग करता यावा या उद्देशाने अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली.अभ्यासिकेचे उद्घाटन मा.श्री भिमा बोबडे यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी कामगार नेते श्री काशिनाथ नखाते, श्री अरुण तुर्कमारे,संस्थेचे प्राचार्य श्री शशिकांत साबळे , गटनिदेशक श्री मोरे ए.एस., गटनिदेशक श्री पावडे एस.बी,संस्थेचे सर्व निदेशक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संतोष गुरव यांनी केले.




