प्रौढांसाठी नाट्य शिबीर संपन्न ; आज होणार सांगता समारोह








मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे,कलापिनीत प्रौढांसाठी नाट्य शिबीर संपन्न झाले. आज , बुधवारी,२० मे सांगता समारोह होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री संदीप देवकर. कलापिनी, तळेगाव दाभाडे येथे दि. ११ मे ते २० मे या कालावधी मधे नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी मार्गदर्शिका म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षिका अंजली ताई कऱ्हाडकर लाभल्या होत्या. त्यांनी शिबिरात सहभाग घेतलेल्या सर्वांना नाटक, एकपात्री, संहिता लेखन, प्रकाश योजना या आणि अशा बऱ्याच गोष्टी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. युवक युवती यांचे सह प्रौढ आणि ज्येष्ठ पुरुष महिला उत्साहाने सहभागी झाले होते. या सर्वांच्या सादरीकरणाचा आनंद आपल्याला घेता येणार आहे.या शिबिराचा सांगता समारंभ उद्या दि २० मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता कलापिनी येथे होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.



