स्थलांतरित मतदारांसाठी लोणावळा नगरपरिषद येथे दिनांक २५ आणि २६ मे ला शिबीर







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहरातील स्थलांतरित मतदारांसाठी दि. २५ .०५ .२०२६ व २६ .०५ .२०२६ रोजी लोणावळा नगरपरिषद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व स्थलांतरित मतदारांनी शिबिरास भेट देणे आवश्यक आहे. अन्यथा आपले नाव मतदार यादीतून वगळले जाईल.
स्थलांतरीत कोणास म्हणावे.
- लोणावळा शहरातील एका यादी भागात वास्त्यव्य व दुसऱ्या यादी भागात नाव असल्यास.
- लोणावळा शहरातील यादी भागात नाव व शहराबाहेर (ग्रामीण) वास्तव्य असल्यास.
- लोणावळा शहरातील यादी भागात वास्तव्य व शहराबाहेरील यादी भागात नाव असल्यास.
अटी :- - मतदार यादीत नाव ठेवणेसाठी त्या भागातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- उपरोक्त मतदारांनी आपल्या मतदान ओळखपत्राचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.
ज्या मतदारांचे mapping झालेले नाही त्यांनीही शिबिरास भेट द्यावी.अत्यंत महत्वाचे :- मतदार यादीतून नाव वगळले गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मतदाराची असेल.
तरी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मतदार यादीतून आपले नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषदचे नगरसेवक सुभाष भाऊ डेनकर यांनी केलं आहे.



