भोसरीगांवचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना सातारा येथे “राष्ट्रीय संत प्रेरणा गौरव पुरस्कार

मावळ मराठा न्युज -दि.१४.०६.२०२६सातारा जिल्ह्यातील वाई येथे रमेश गरवारे सभागृह , लोकमान्य टिळक ग्रंथालय या ठिकाणी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य ( महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय राष्ट्रसंत प्रेरणा गौरव पुरस्कार राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय सामाजीक कार्य करणार्‍या २८ जणांना पुरस्कार बहाल करण्यात आले.
यावेळी कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे हे विविध कार्य समाजाच्या अंधारलेल्या वाटांवर आशेचा दीप बनुन उभे राहून दुःखी आणि गरजूंच्या आयुष्यात मायेचा हात देऊन , मानवतेची खरी पुजा आपल्या कार्यातुन जपुन खर्‍या अर्थाने समाजातील प्रेरणास्थान बनले.आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात अनेकजण स्वताःपुरते जगताना दिसतात. पंरतु ते मात्र आपल्या सुखाचा विचार न करता समाजातील वंचित , निराधार , गरजु , पिडीत आणि उपेक्षित घटकांसाठी आयुष्य झोकुन देत आहे.
त्यांच्या कार्यातुन समाजात माणुसकीचे बीज रुजत आहे. आशेचे किरण पसरत आहेत आणि अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा त्यांच्यामुळे मिळत आहे.
तसेच कला,क्रिडा ,सांस्कृतिक,धार्मिक , शैक्षणिक , आरोग्य , पर्यावरण , राजकिय , पत्रकारिता , साहित्यिक , उद्योग अशा अनेक कार्यात त्यांचे पिंपरी चिंचवड शहरात मोठे योगदान असल्यामुळे वरील संस्थेने पैलवान काळुराम लांडगे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामामुळे राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा ” संत गाडगे महाराज समाजभुषण पुरस्कार २०२६ “सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल , मानाचाफेटा सन्मानीय प्रमुख पाहुणे पुणे येथील जेष्ठ शास्रज्ञ DRDO चे मा.डॉ.अशोक नगरकर सर ,वाई पंचायत समितीच्या उपसभापती मा. सौ.वर्षाताई जगताप ,सामाजीक कार्यकर्ते मा.पैलवान तुषारभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.
कार्यक्रमाला पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.
कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शशिकांत कोचळे सर व त्यांच्या संस्थेच्या संपुर्ण कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page