ओवळे गावच्या सरपंचपदी निवड होताच सोमनाथ इंगळे यांच्याकडून ओवळे गावच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके यांच्याकडे निधीची मागणी








मावळ मराठा न्युज – मावळ तालुक्यातील ओवळे गावाचे नूतन सरपंच सोमनाथ इंगळे आणि ग्रामस्थांनी आमदार शेळके यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन गावातील प्रलंबित कामांचे निवेदन दिले.गावचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळवून देणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सरपंच सोमनाथ इंगळे यांनी या वेळी स्पष्ट केले. ओवळे गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे, नवीन रस्ते तयार करणे यासह इतर विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी आमदारांकडे केली. आमदार सुनील शेळके यांनी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून ओवळे गावाच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सरपंच सोमनाथ इंगळे यांच्या या गतिमान पाऊलामुळे ओवळे गावातील विकासकामांना आता मोठी गती मिळणार असून ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.अशी माहिती ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते-शिवभक्त-अजित भाऊ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.



