रोटरी क्लब ऑफ लोणावळाची सेवाकार्यांची हॅट्रिक – सलग तीन दिवस तीन समाजोपयोगी उपक्रम

मावळ मराठा न्युज -लोणावळा,(दि.३जुलै २०२६) रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रोटरिअन ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सलग तीन समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या राबवत सेवाकार्यांची उल्लेखनीय “हॅट्रिक”पूर्ण केली.

या सेवाकार्याची सुरुवात दि. १ जुलै २०२६ रोजी डॉक्टर्स डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रकल्पाने झाली. समाजाच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या सेवेला मानवंदना अर्पण करण्यात आली.

त्यानंतर दि. २ जुलै २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रकल्प तृप्ती” अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, डोंगरगाववाडी येथे विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्नाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

दि ०२ व ०३ जुलै चे प्रकल्प रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमांना दोन्ही क्लबमधील पदाधिकारी, सदस्य, शिक्षकवृंद तसेच स्थानिक नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले.रोटरी इंटरनॅशनलच्या यावर्षीच्या “Create Lasting Impact” या संकल्पनेला अनुसरून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा रोटरी क्लब ऑफ लोणावळाचा संकल्प अधिक दृढ झाला असून,आगामी काळातही अशाच नाविन्यपूर्ण आणि लोकहितकारी प्रकल्पांची मालिका सुरू राहणार असल्याचे अध्यक्षा रोटरिअन ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page