संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शालांत परीक्षेत महाराष्ट्र राज्यात विज्ञान विभागात १०० % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु.आर्यन दळवी याचा सन्मान

मावळ मराठा न्युज :-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत महाराष्ट्र राज्यात विज्ञान विभागात १०० % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व लोणावळा शहरात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कु. आर्यन राजेंद्र दळवी या विद्यार्थ्याला लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी शहर संघटिका मनीषाताई भांगरे, उपशहरप्रमुख विशाल पाठारे, निखिल सोमण, सल्लागार राजू चव्हाण, पराग राणे, बाळासाहेब सकट,सोशल मीडिया समन्व्यक नंदू कडू, विभागप्रमुख प्रमोद लोयरे,शाखाप्रमुख प्रमोद फाटे, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष दिलीप दुबे, शाखाप्रमुख परेश वावळे, शाखाप्रमुख प्रसाद कन्नन, राजेंद्र दळवी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page