शिवदुर्ग क्लायंबिंग टीमच्या आदित्य शंकर पिलाने याने १८ ते १९ या वयोगटामध्ये नॅशनल युथ चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक

मावळ मराठा न्यूज़ १२/०८/२०२३ रोजी बेंगलोर येथे झालेल्या नॅशनल युथ चॅम्पियनशिप साठी शिवदुर्ग क्लायंबिंग टीम च्या तीन क्लायंबर नी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये आपल्या टीमचा क्लायंबर कु आदित्य शंकर पिलाने याने १८ ते १९ या वयोगटा मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. ही लोनावला साठी खुप आभिमानास्पद आहे. तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान चायना येथे होणारया एशियन युथ चॅम्पियनशिप साठी आपली जागा निश्चित केली आहे. आपल्या शिवदुर्गचा पहीलाच क्लायंबर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंडीया क्लायंबिंग टीम बरोबर परफॉर्म करणार आहे.ही गोष्ट आपल्या शिवदुर्ग साठी खुप अभिमानास्पद आहे . त्याच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page