ई व्ही एम घोटाळा होऊ शकतो का पुणे युनिव्हर्सिटी मधून BE-आईटी झालेले रोहन तावरे काय म्हणतात…..
मावळ मराठा न्युज -विधानसभेच्या निकालानंतर मी EVM वर शंका घेणारी एक पोस्ट टाकली होती. कोणतीही लाट नसताना भाजपा महायुतीला जो काही प्रचंड मोठा जनाधार मिळाला आहे असे जेव्हा निकालात समोर आले तेव्हा खुद्द महायुती समर्थक सुद्धा शॉक मध्ये होते त्यामुळे EVM शंका घेतली जात असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही असे माझे स्पष्ट मत आहे.मी २०११ मध्ये माझी IT मधील नोकरी सोडली. System Analyst ह्या पोस्टवर मी ६ वर्ष काम करत होतो त्यामुळे त्या काळात अनेक कॉम्प्लेक्स कोड मी लिहिले आहेत तसेच अनेक सॉफ्टवेअर चे system architecture डिझाईन केले आहे. त्यामुळे कोड करताना जे अपेक्षित आहे त्याच बरोबर इतर काय काय करामती आपण सॉफ्टवेअर मध्ये करू शकतो ह्याची पूर्ण कल्पना मला आहे. इतकंच काय तर जेव्हा मी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मी शिकायला होतो तेव्हा मी आणि काही मित्रांनी कॉम्पुटर लॅब मधील सर्व कॉम्प्युटर्स मध्ये असे Spyware टाकले होते की त्या कॉम्पुटर वर टाईप होणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही नंतर वाचू शकायचो. त्यामुळे प्रत्येक युनिट टेस्टच्या आधी सेट केलेले पेपर आमच्या हाती आधीच आलेले असायचे. २-३ युनिट टेस्ट नंतर आमच्या लक्षात आले की असे करून आम्ही युनिट टेस्ट तर पास करू पण मुख्य पेपर पुणे युनिव्हर्सिटी मधून येणार आणि मग तेव्हा आम्ही काय करणार त्यामुळे आमच्या मधील स्वाभिमानी विद्यार्थी जागा होऊन आम्ही सर्व Spyware काढून टाकले होते. त्यामूळे काय आणि कश्या गोष्टी हॅक होवू शकतात आणि EVM च तेवढे ब्रम्हदेवाने बनवले असल्याने ते मात्र हॅक होऊ शकत नाही असे ज्यांना ज्यांना वाटते ते आजच्या AI च्या युगात नसून अश्मयुगात आहे असे समजावे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही कंपनी EVM बनवते. जर मी ह्या कंपनीत कोडर म्हणून कामाला असेल आणि मला सांगण्यात आले की आपल्याला EVM manipulation करायचे आहे आणि मला २-४ करोड दिले तर मी खालील पद्धत वापरून कोड करेल:१. प्रत्येक EVM मध्ये एक नॅनो चीप असेल जी प्रथमदर्शी मुख्य कंट्रोल युनिट चाच भाग वाटेल. परंतु तिचे काम असेल वेगळेच. २००० च्या नोटेत नॅनो चीप आहे मानणारे इतका तरी विश्वास ठेवतील की नखा एवढी चीप बनवणे आज अवघड नाही आहे किंबहुना अश्या चीप तुमच्या हँडसेट मध्ये आजही आहेत.२. एका विधानसभा क्षेत्रासाठी ज्या EVM दिल्या जातील त्या सर्व EVM मधील ह्या सीक्रेट चीप मध्ये एक सॉफ्टवेअर असेल ज्याचे काम व्होटिंग सुरू असताना सुरू नसेल. म्हणजेच व्होटिंग एकदम नॉर्मल पद्धतीने सुरू राहील. जर कोणी चेक केले तरी ज्याला वोट दिलं आहे त्यालाच वोट जाईल आणि vvpat पण त्याचेच निघेल.३. ह्या सर्व EVM जरी एका मतदारसंघासाठी असल्या तरी पोलिंग बूथ एकमेकांपासून कित्येक किलोमीटर दूर असल्याने ह्या EVM तश्या isolation मध्ये काम करत राहतील. ४. मतदान संपल्यावर जेव्हा ह्या सर्व EVM गोळा करून पोलीस बंदोबस्तात सीलबंद करून जेव्हा एका जागी स्ट्राँग रूम मध्ये एकत्र ठेवल्या जातील त्यानंतर मी केलेला कोड काम करायला सुरुवात करेल.५. ह्या मशीन एकत्र ठेवल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार ह्यात १ दिवस जो मध्ये असतो त्या दिवशी दुपारी १ वाजले की त्या सीक्रेट चीप सिग्नल पाठवून त्या रूम मधील सर्व EVM पैकी एक मास्टर EVM ची निवड होणार. ही निवड मी केलेल्या कोड च्या मार्फत होणार. बाकीच्या मशीन ह्या स्लेव होणार. आता जी मास्टर मशीन आहे जी इतर सर्व स्लेव मशीन मधून एका मागो मागे एक अश्या पद्धतीने कोणाला किती वोट पडले आहेत ह्याची माहिती त्या EVM च्या कंट्रोल युनिट मधून मागवून घेणार आणि मेमोरी मध्ये एक टेबल बनवणार. ६. जर मला हवा आहे तोच उमेदवार जिंकत आहे असे दिसले तर पुढील सर्व गोष्टी त्या जागी तिथल्या तिथे थांबणार. ७. जर हवा आहे तो उमेदवार जिंकत नाही असे लक्षात आले की खरा खेळ सुरू होणार. ह्या मध्ये मी असा कोड करणार की कमीत कमी EVM मशीन चे वोट कंट्रोल युनिट मध्ये न फेरफार करता मला हवा तो उमेदवार कसा निवडून आणता येईल. मग त्या कोड द्वारे अश्याच EVM ची निवड होणार ज्या मध्ये आता मला कंट्रोल युनिट मधील मतांचा काउन्ट बदलायचा आहे. ८. जर माझा आवडीचा उमेदवार जर २ नंबर मतांवर असेल तर मी पहिल्या नंबर च्या उमेदवाराची तितकी मत कमी करून तेवढी माझ्या उमेदवाराला देणार नाही. इतकं सरळ सरळ न करता मी काही EVM मधील मते तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला तर काही ठिकाणी चौथ्या तर काही ठिकाणी माझ्या उमेदवाराला अश्या पद्धतीने मतांची विभागणी अशी करणार की शेवटी माझा उमेदवार हा सर्व EVM मोजणी मध्ये पहिल्या नंबर वर येणार.आता मी IT जॉब सोडून १३ वर्ष झाली तरी मी ठामपणे सांगू शकतो की वरील गोष्टीचे सगळे architecture बनवून कोड लिहून तो टेस्ट करायला मला एक महिना खूप झाला. तेही एकट्याला. जर माझ्या बरोबर BEL मधील इतर कोडर आणि अदृश्य शक्तीचा हात असेल तर मग बोलायलाच नको.बरं जर हे जे काही लिहिले आहे तो कल्पना विलास आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी त्यांचा मोबाईल हँडसेट मला आणून द्यावा. मी त्या बदल्यात त्यांना नवीन भारीतला हँडसेट त्यांना पुढे वापरायला देईल. वापरतील का ते? ECI सारखं मी सुद्धा सांगतो ना की मी दिलेल्या हँडसेट मध्ये काहीही असे नाही जे तुमची गोपनीय माहिती मला पुरवत राहील. जर तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवून मी दिलेला हँडसेट नसणार वापरणार तर आपण वोटर म्हणून त्यांनी सांगितले म्हणून कोणत्या भरोश्यावर आपले दिलेले मतदान ज्याला दिलं आहे त्यालाच मिळाले असे छातीठोकपणे सांगू शकता?- रोहन तावरे-(लेखक हे २००५ मध्ये डिस्टिंक्शन मध्ये पुणे युनिव्हर्सिटी मधून BE-IT झाले आहेत आणि अंधभक्त नाहीत)