महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या लोणावळ्यातील भांगरवाडी येथील घरोघरी भेटी गाठी,पत्रक वाटप प्रचाराला चांगला प्रतिसाद




मावळ मराठा न्युज :-लोणावळा मावळ लोकसभा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोगभाऊ वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या आज पाचव्या दिवसा निमीत्त लोणावळा शहरातील प्रभाग क्रमांक ५ भांगरवाडी येथील श्री राम मंदिर येथे पुष्पहार अर्पण करून,नारळ फोडुन प्रचाराला सुरूवात करण्यात आली.यावेळी नागरीकांच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेऊन परीचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.यावेळी लोकांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला.यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आजी माजी पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका,महिला आघाडी,सेवादलच्या महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.




