गोपाळराव तंतरपाळे यांचे आपल्या सहकारी सह वडगाव मावळ तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन


मावळ मराठा न्यूज ,वडगाव मावळ :-गोपाळराव तंतरपाळे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली भीमशक्तीच्या वतीने तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी वडगाव मावळ यांचे दालना समोर आज दुपारी २ वाजता आंदोलनास सुरुवात करण्यात आली. आंदोलनामध्ये मौजे ओवळे तालुका मावळ येथील सौ लक्ष्मी विजय कांबळे यांची वडीलोपार्जित बौद्ध वतनाची शेतजमीन श्री गणेश पोपट खिलारे यांनी बळकावली त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी तसेच मौजे मळवली येथील श्री रवींद्र रामचंद्र पटेकर यांची वतनाची वडिलोपार्जित शेत जमीन श्री विकास विठ्ठल मुंगसे व श्री डॉ. वसंत निकम यांनी बळकावली आहे त्यांचे वर ॲट्रॉसिटी दाखल करावी व इतर शेत जमिनी संदर्भात मागण्या होत्या सदर मागण्या संदर्भात नव्याने रुजू झालेले मा. श्री विक्रम देशमुख सर तहसीलदार व श्री विलास भोसले पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वडगाव मावळ यांनी मध्यस्थी करून दिनांक २५/४/२३ रोजी मंगळवार सकाळी ११ वाजता तहसीलदार यांच्या दालनात संबंधित सर्व अधिकारी यांची मीटिंग आयोजित केली आहे त्यामुळे सदरचे आंदोलन तूर्त स्थगित करीत आहे शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री गोपाळराव तंतरपाळे दादा यांनी केले असून त्यांच्यासमवेत श्री संतोष चौगुले श्री संदीप तांबे श्री राजेंद्र यादव राजाभाऊ कदम माजी सरपंच श्री सत्यवान शितोळे श्री पंकज तंतरपाळे रमेश पवार श्री माऊली सोनवणे व अन्यायग्रस्त सौ लक्ष्मी विजय कांबळे व श्री रविंद्र रामचंद्र पटेकर इत्यादी उपस्थित होते




