कार्ला खडकाळा जिल्हा परिषद गटात प्रचाराला मोठा प्रतिसाद; हीच आमच्या कामाची खरी पोच पावती – दिपाली हुलावळे








मावळ मराठा न्युज -लोणावळा,कार्ला खडकाळा या जिल्हा परिषद गटामधून मी निवडणूक लढवावी याकरिता या संपूर्ण पंचक्रोशी मधील नागरिकांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी लावून धरली होती. आज या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रचारासाठी गेल्यानंतर नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद व पाठिंबा हीच खर तर आमच्या कामाची पोचपावती असल्याचे कार्ला खटकाळा जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, आरबीआय व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या अधिकृत उमेदवार दिपाली दीपक हुलावळे यांनी म्हटले आहे. दिपाली हुलावळे म्हणाल्या आमचे कुटुंब मागील अनेक वर्षापासून या संपूर्ण भागामध्ये समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखा मध्ये आमच्या कुटुंबातील व्यक्ती सहभागी होत असतात म्हणूनच जनतेचे प्रेम व विश्वास आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या दरम्यान मिळत आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून आम्ही या संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये सातत्याने नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहे. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. प्रत्येक गावामध्ये प्रचाराच्या निमित्त जात असताना त्या गावातील नागरिक विशेषता महिला, तरुण व ज्येष्ठ मोठ्या संख्येने आमच्या स्वागतासाठी गावांमध्ये उपस्थित राहत आहेत. गावागावांमध्ये रांगोळ्या काढत फटाक्यांची आताच बाजी करत व मोठ्या आपुलकीने प्रेमाने आमचे औक्षण करत आम्हाला आमचे जिवाभावाचे मतदार विजयाच्या शुभेच्छा देत आहे. प्रत्येक गावामध्ये मोठा प्रतिसाद या प्रचाराला मिळत आहे. या संपूर्ण भागामधील नागरिकांच्या समस्या आम्ही जाणून घेतले आहेत व पुढील काळामध्ये या सर्व समस्या सोडवण्याचे हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या निवडणुकीच्या निमित्ताने नागरिकांना देत आहोत. केवळ आश्वासन देऊन थांबणाऱ्यांपैकी आम्ही नाही तर ती कामे आम्ही एक कालबद्ध कार्यक्रम राबवत पूर्ण देखील करणार आहोत. केवळ गावांमध्ये रस्ते पिण्याचे पाणी लाईट गटारी याच सुविधा नाही तर या गावांचा शाश्वत विकास करत येथील तरुणांना येथील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देखील आम्ही काम करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे निधी तसेच वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना या सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवत प्रत्येकाचे जीवनमान उंचावणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुका येतात जातात पण आपुलकी, स्नेह व आपलेपणा हा कायम राहिला पाहिजे, व तो टिकवण्याचा आम्ही कायम प्रयत्न करत आलोय. म्हणूनच प्रत्येक गावामध्ये आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा हा विश्वास कायम टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



