“ज्येष्ठोत्सव “सनवल्ड मध्ये ब्लॅकमेल एकांकिका प्रथम



मावळ मराठा न्युज :-प्राधिकरण, निगडी- (बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर)दि . २० ते २२ सप्टेंबर रोजी पुण्यात संपन्न झालेल्या ‘ज्येष्ठोत्सव’ या सनवल्ड पुणे या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये दि .२१ रोजी शब्दरंग कला साहित्य कट्टा या प्राधिकरण येथील संस्थेने ” ब्लॅकमेल ” ही एकांकिका सादर केली . श्री सदानंद इनामदार लिखीत आणि श्री अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शित केलेली अतिशय उत्कंठा वर्धक आणि रहस्यमय असलेल्या या एकांकिकेतश्री सुभाष भंडारे, चंद्रशेखर जोशी, सतीश सगदेव, शरद यनुवारसौ पल्लवी कोंडेकर आणि सौ ज्योती कानेटकर या कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या. सदर एकांकिकेला स्पर्धेत प्रथम क्रमांकाची एकांकिका म्हणून गौरवण्यात आले . एकूण १५ संघांनी एकांकिका सादर केल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे गेली १३ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच हा करंडक आला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे . या एकांकिकेला श्री मुकुंद जोशी आणि संपदा दिवाकर यांनी पार्श्वसंगीत दिले होते.प्राधिकरण मधील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन केले.




