प्रा.रामकृष्ण मोरे माध्यमिक विद्यालय खंडाळा शाळेचा ४० वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्यूज़ :- खंडाळा, प्रा. रामकृष्ण मोरे माध्यमिक विद्यालय खंडाळा शाळेचा ४० वा वर्धापनदिन शाळेचे माजी विद्यार्थी याच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले व श्री.सुरेश भ गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र दिवेकर, श्री.बोरसे डी. आर, श्री. सुर्यवंशी आर. पी, श्री. चव्हाण पी. बी, सौ. भाले एस. एस, कु. पाथरे ए. ए. माजी विद्यार्थी उपस्थित संस्थापक अध्यक्ष श्री. मंगेश खराडे, सदस्य,श्री. अशोक गवारणे, अध्यक्ष श्री सुरेश भ. गायकवाड सर्व मान्यवरांच्या हस्ते १०मध्ये उतिर्ण झालेल्या पहिल्या तिन मुलीचा पेढा भरवून नारळ गुलाबाचे फुल देऊन गौरवण्यात आले. विध्यार्थीना वह्यां व पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.माजी विद्यार्थीनी र्श्री. मंगेश खराडे, श्री. अशोक गवारणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page