लायन्स लिजन्ड्स लोणावळा क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न







मावळ मराठा न्युज,लोणावळा, शुक्रवार ,दिनांक २७/०६/२५ लायन्स लिजन्ड्स लोणावळा क्लब चा पदग्रहण समारंभ काल हाॅटेल चंद्रलोक येथे लायन एम जे एफ गिरीश मालपाणी यांच्या हस्ते पार पडला. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लायन धनंजय धुमाळ, विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा डाॅ.सौ. मृणालिनी गरवारे , वसंत व्याख्यानमाला समितीचे उपाध्यक्ष श्री प्रशांत पुराणिक उपस्थित होते. लायन्स लिजंन्ड्स क्लब च्या २०२५/२६ चे अध्यक्ष म्हणून लायन सौ. वैशाली धनंजय साखरेकर यांची निवड झाली. सचिव पदासाठी सौ. मीनाक्षी गायकवाड यांची निवड झाली .तर खजिनदार म्हणून सौ.नूतन घाणेकर यांची निवड झाली. लायन्स लिजंडसच्या २०२५/२६ च्या कार्यकारिणीत सहसचिव लायन सौ. मोनिका अगरवाल, सहखजिनदार लायन सौ. कीर्ती अगरवाल, प्रथम उपाध्यक्ष लायन डॉक्टर प्राची पाटेकर, द्वितीय उपाध्यक्ष लायन सौ. प्रतिभा दरेकर, तृतीय उपाध्यक्ष लायन सौ. रोहिणी रसाळ, क्लब मेंबरशिप चेअरमन लायन अमित अगरवाल व लायन सौ. उमा मेहता, क्लब जी. एल. टी. चेअरमन लायन डॉक्टर हेमंत अगरवाल, क्लब सर्विस चेअरमन लायन सुरेश गायकवाड, क्लब मार्केटिंग चेअरमन लायन रमेश लूनावत व आयपीपी लायन गोरख चौधरी यांची निवड झाली. वरील सभासदांचा शपथग्रहण विधी लायन एमजेएफ गिरीश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. लायन्स लिजंड्सच्या संचालक मंडळामध्ये लायन नंदकुमार वाळंज, लायन सौ. वत्सलाताई नंदकुमार वाळंज, लायन राजेश मेहता, लायन बनवारीलाल गुप्ता, लायन डॉक्टर वामनराव गुजर, लायन विवेक घाणेकर, लायन हेमंत पाटेकर, लायन रामदास दरेकर, लायन विजय रसाळ, लायन मनोज लऊळकर, लायन डॉक्टर श्रीकांत रावण, लायन समीर भल्ला, लायन धनंजय साखरेकर, लायन अमित बॅनर्जी व लायन दीपक जैन यांचा समावेश आहे. पदाधिकाऱ्यांच्या शपथग्रहण समारंभा नंतर क्लब मधे सामिल झालेले नवीन सभासद लायन उदय पाटील, लायन सौ. जयश्री पाटील, लायन मनोज कदम, लायन सौ. कृतिका कदम, लायन अशोक अगरवाल,लायन सौ. दिपाली अगरवाल,लायन सुनील पानगावकर, लायन सौ. संगीता पानगावकर यांना लायन डॉक्टर हेमंत आगरवाल यांनी क्लबची माहिती सांगून त्यांना क्लबचे नियम व अटी समजावून सांगितल्या. क्लब मधील त्यांचा सहभाग हा तन, मन व धनाने परिपूर्ण असेल याबद्दल विचारणा करून शपथ ग्रहण करण्यास सांगितले. यानंतर लायन्स एक्सलेन्सी अवॉर्ड जाहीर करण्यात आले. यामध्ये यावर्षी तीन संस्थांची निवड करण्यात आली. त्यामध्ये विद्याप्रसारिनी सभा या संस्थेला १०१ वर्ष पूर्ण झाले. ह्या संपूर्ण शतकात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचा सन्मानचिन्ह आणि फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान विद्याप्रसारीनी सभेच्या अध्यक्षा डाॅ.सौ. मृणालिनी गरवारे यांनी स्वीकारला. दुसरी संस्था ही लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमाला समिती ही होती. ही समिती गेली २३ वर्ष अखंडपणे लोणावळ्यातील लोकांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करते. ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयातील तज्ञ व्याख्याते बोलवून कधी मार्गदर्शनपर, तर कधी मनोरंजनपर कार्यक्रमांचे – व्याख्यानांचे आयोजन करते. हा सन्मान स्वीकारण्यासाठी वसंत व्याख्यानमाला समितीचे उपाध्यक्ष श्री प्रशांत पुराणिक उपस्थित होते. त्यांचा देखील सन्मान चिन्ह व सरस्वतीची फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सोमनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, नांगरगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह व फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर श्री अरविंद भाई मेहता,श्री प्रशांत देशपांडे,उपस्थित होते. लायन एमजेएफ गिरीश मालपाणी यांनी आपल्या व्याख्यानातून सर्व लायन्स ना मार्गदर्शन केले. लीडर कसा असावा हे एम.एस.धोनी चे उदाहरण देऊन, त्याच्यातील नेतृत्व गुणांचा संदर्भ सांगून त्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला दिला. आपल्या भाषणातून त्यांनी धार्मिक, ऐतिहासिक ,क्रीडा अशा वेगवेगळ्या विषयातील उदाहरणे देऊन सर्व लायन्स सभासदांना उत्तम काम करण्यासाठी प्रेरित केले.क्लबच्या नवीन अध्यक्षा सौ. वैशाली धनंजय साखरेकर यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या कार्यकालात होणार असणाऱ्या कामांची माहिती दिली. ज्यामध्ये वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलांसाठी एक शाळा बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी व रहिवाशांसाठी एक पाणपोई देखील बांधणार असल्याचे सांगितले. यानंतर एक टॉयलेट ब्लॉक आणि एक कम्युनिटी हॉलचा प्रोजेक्ट देखील हाती घेण्याचा त्यांचा विचार आहे असे त्यांनी उद्घोषित केले. याचबरोबर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट तर्फे एक मेडिकल कॅम्प घेऊन त्यामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी ,ऑपरेशन व त्याबरोबरचा औषधोपचार करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब डायमंड, लायन्स क्लब सुप्रीमो, लायन्स क्लब लोणावळा, लायन्स क्लब लोणावळा- खंडाळा ,रोटरी क्लब या सर्व क्लब चे पदाधिकारी व आमंत्रित सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन सौ. उमा मेहता व लायन सौ. प्रतिभा दरेकर यांनी केले .आभार प्रदर्शन लायन रमेश लूनावत यांनी केले . लायन नंदकुमार वाळंज यांनी सर्वांचे अभिवादन करून लायन्स तर्फे दरवर्षी वारकरी संप्रदायासाठी करण्यात येणाऱ्या सेवाकार्याची माहिती दिली. लायन डाॅक्टर हेमंत अगरवाल यांनी एमजेएफ लायन गिरीश मालपाणी यांचा परिचय करून दिला. लायन सौ. नूतन घाणेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष लायन सौ. वैशाली साखरेकर यांचा परिचय करून दिला.लायन राजेश मेहता यांनी एक्सलन्सी ॲवाॅर्ड ची माहिती दिली.लायन विवेक घाणेकर यांनी ध्वजवंदना सादर केली. लायन रामदास दरेकर यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. लायन विजय रसाळ यांनी गतवर्षी झालेल्या जमाखर्चाचा लेखाजोखा सांगितला व आयपीपी लायन गोरख चौधरी यांनी त्यांच्या गतवर्षीच्या कामाचा आढावा सर्वांसमोर मांडला. सर्वात शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




