साधी माणसं” कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न



मावळ मराठा न्यूज,पुणे,१५ ऑगस्ट २०२४ रोजी, सकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. (महावितरण) कार्यालय, रास्ता पेठ येथे यंत्रचालक पदी कार्यरत असणारे श्री. संतोष हेगडे यांच्या “साधी माणसं” या कथासंग्रहाचे प्रकाशन माननीय श्री. राजेंद्र पवार साहेब, मुख्य अभियंता, पुणे झोन, महावितरण यांच्या हस्ते विधिवतपणे करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पवार साहेबांनी “साधी माणसं” या पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखक श्री. संतोष हेगडे यांच्या कथेतील पात्रांच्या साधेपणाचे आणि त्यांच्या संघर्षाचे महत्व उल्लेखनीयपणे उजळून दाखवले. त्यांनी ग्रामीण भागातील साध्या आणि सरळमार्गी लोकांच्या जीवनातील अडचणींचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे केलेले असल्याचे सांगितले.पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमास सहाय्यक व्यवस्थापक (मा. सं.) श्रीमती ज्ञानदा नीलेकर, सहाय्यक व्यवस्थापक (वि. व. ले.) श्रीमती राऊत, अधीक्षक अभियंता श्री. जरग, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता श्री. बिक्कड, श्री. दिघे साहेब, उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष पटणी , तांत्रिक कामगार युनियन पुणे झोन पदाधिकारी श्री. संतोष खताळ, श्री. इंद्रजित खरबस, श्री. किशोर चोभे, श्री. अशोक मुळे, श्री. श्रीपाल दिक्षित, श्री. जीवन शेवाळे, श्री. अभिजित गुढेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश वीर, श्री. विनायक लोहकरे, श्री. संदिप खळदकर, श्री. सुरज पवार इत्यादी उपस्थित होते आणि स्थानिक साहित्यप्रेमी देखील उपस्थित होते. सर्वांनी श्री. संतोष हेगडे यांच्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.”साधी माणसं” हा कथासंग्रह ग्रामीण भागातील साध्या आणि कष्टाळू व्यक्तींच्या जीवनातील अडचणी आणि त्यांच्या संघर्षाचे यथार्थ चित्रण करते. प्रत्येक कथा विविध पात्रांचे जीवन आणि त्यांच्या समस्यांचे समाधान यांचे वर्णन करते.पुस्तकाची किंमत ₹२५० /- आहे आणि सुरुवातीच्या १०० बुकींगसाठी फ्री डिलीवरीची सुविधा उपलब्ध आहे. पुस्तक खरेदीसाठी आणि अधिक माहितीसाठी सौ. प्रियंका हेगडे ( ९९६०२८१२२६ ) यांच्याशी संपर्क साधा




