स्व.अजितदादा पवार जयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न

मावळ मराठा न्यूज -चिखली, प्राधिकरण -दिनांक २३ जुलै रोजी श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे दिवंगत कर्तृत्ववान उपमुखमंत्री ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या .
श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली या ठिकाणी दादांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली . पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दादांच्या कार्याचा गुणगौरव करत आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. मा . प्रकाशराव मोरे व प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा. सुरेखा देशमुख यांनी भूषविले . नगरसेवक पिंपरी चिंचवड मा. विकास साने यांनी वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून दिली . शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .
विद्यालयाचे प्राचार्य मा .सानप सर, उपमुख्याध्यापिका मा .नाणेकर मॅडम, पर्यवेक्षिका मा .ठोंबरे मॅडम व पर्यवेक्षिका मा .पंडित मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला .श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
काही माणसं पदाने मोठी असतात.. काही कामाने मोठी असतात आणि मनानेही मोठी असतात.. महाराष्ट्राच्या इतिहासातील न भूतो न भविष्यति.. कामाचा माणूस.. कामाचाच माणूस म्हणून प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत..
महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं आपलं ध्येय आणि आपण घेतलेले कष्ट.. प्रशासनाला लावलेली शिस्त.. प्रत्येक कामातील आपली दूरदृष्टी.. समाजाभिमुख लोकहिताची आग्रहाने घेतलेली स्पष्ट भूमिका.. प्रत्येक क्षेत्रात असलेला आपला वावर.. कामाचा धडाका अगदी शेवटच्या क्षणी सुध्दा साक्ष देत होता. अशा भावना आपल्या भाषणातून व्यासपिठावरील मान्यवरांनी व्यक्त केल्या . रांगोळी प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता . सूत्रसंचलन सौ बुरुड मॅडम यांनी केले . आभार श्री बोरचटे सरांनी मानले .

..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page