लोणावळा कैवल्यधाम योग महाविद्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न,९० रक्तदात्यांनी केले रक्तदान



मावळ मराठा न्यूज -लोणावळा,गोवर्धनदास सेक्सेरिया योग महाविद्यालय, कैवल्यधाम, लोणावळा च्या प्राचार्या डॉ. बंदिता सतपते, डॉ. गुरुराज, लोणावळ्यातील डॉ. सचिन भिसे, डॉ. अमोल रानडे, डॉ शैलेश शहा, डॉ. विकास नय्यर डॉ. दिनमित्र माने, मनशक्ती लोणावळा चे डॉ. सुहास गोसावी तसेच श्रद्धा ब्लड स्टोरेज सेंटर, लोणावळा चे तंत्रज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.शिबीराच्या समन्वयक श्रीमती रागिनी गुप्ता होते,तर कैवल्यधाम संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी, लोणावळा व ग्रामिण परिसरातील नागरिक यांनी असे एकुण ९० जणांनी रक्तदान केले.




