मावळात बाळा भेगडे भाजपात आहेत का? या प्रश्नाने भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेची दमछाक



मावळ मराठा न्युज -वडगांव विधासभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महायुती विरोधात प्रचार केला.त्यामुळे त्यांचेवर पक्षाने काय कारवाई केली हे सर्व सामान्य जनतेला कळले पाहिजे म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या भेगडे पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यांच्या पक्षाविरोधी कारवाई करणारे बाळा भेगडे भाजपमध्ये आहेत का? या प्रश्नाचे थेट उत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळले आणि शिस्तभंग समिती त्यांचा निर्णय घेईल असे बावनकुळे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाळा भेगडे यांनी आमचे ऐकले नाही. पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे तो विषय जाईल. त्या ठिकाणी त्यांच्याबाबत निर्णय होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडे यांनी महायुतीचे काम न करता मावळ पॅटर्न राबविला व अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार केला. त्याबाबत बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते.बाळा भेगडे भाजपमध्ये आहेत का, या प्रश्नावर बावनकुळे यांनी थेट उत्तर देणे टाळले. पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतर ते म्हणाले की, बाळाभाऊंनी आमचे ऐकले नाही. पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे तो विषय जाईल. त्या ठिकाणी त्याबाबत निर्णय होईल.मावळातील भाजपच्या बहुतेक कार्यकर्त्यांनी महायुतीचेच काम केल्याचा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला. उमेदवारीवरून काही कार्यकर्ते नाराज होते, त्यांना समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले. मावळ पॅटर्नला भाजपचा छुपा पाठिंबा होता, या आरोपाचा बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.पक्षविरोधी कामाचा ठपका असलेल्या बाळा भेगडे यांच्या खासगी कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उपस्थिती लावल्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात तो मोठा चर्चेचा विषय बनला आहे.




