लोणावळा शहर व ग्रामीण हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हे दाखल,१ लाख २ हजारचा गुटखा जप्त

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई. कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी आज दिनांक २२/०२/२०२४ रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लोणावळा ग्रामीण पो.स्टे. हद्दीत मौजे औंढे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे इसम नामे १) मच्छिंद्र किसन घनवट, वय ३२ वर्ष हा त्याचे मालकीचे खोलीमध्ये, व लोणावळा शहर पो.स्टे. हद्दीत इसम नामे २) धवल रमेश लुनावत हा त्याचे मालकीचे लूनावत होलसेल स्टोअर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा, तालुका मावळ, जि पुणे अशा दोन इसमांचे ताब्यातून महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे ०१ ,०२ ,२०९ रू. (अक्षरी एक लाख दोन हजार दोनशे नऊ रूपये) एवढ्या किमतीचां गुटखा जप्त करून नमूद दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत अनुक्रमे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.हवा बंटी कवडे, मपोहवा आशा कवठेकर, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page