सुक्ष्म योग फाउंडेशन आणि महिला मंडळ लोणावळा यांच्या विद्यमाने ९० दिवसांचा मोफत योगा वर्ग







मावळ मराठा न्युज – लोणावळा,योगगुरू पंकज शर्मा संचलित सुक्ष्म योग फाउंडेशन लोणावळाच्या वतीने मोफत नियमित ऑफलाइन योग वर्ग १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ महिला मंडळ, लोणावळा यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहेत. तुमचे मन आणि शरीर बदलण्यासाठी ९० दिवसांचा नियमित सराव सर्वांसाठी खुला आहे. सदर मोफत योगा क्लासेस सोमवार ते शनिवार सकाळी ७ आणि ८ वाजता नियमित घेण्यात येणार आहेत तरी लोणावलेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सूक्ष्म योगा फाउंडेशन आणि महिला मंडळ लोणावळा यांच्यावतीने करण्यात आले आहे. “मोफत योग ९० दिवस लगेच नोंदणी करा. त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर त्वरित संपर्क करा.+९१ ९०९६५६०२०४



