पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका संघ,कार्यकारिणी जाहीर,सचिन ठाकर यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी तर रेखा भेगडे यांची कार्याध्यक्षा पदी सर्वानुमते निवड

मावळ मराठा न्युज -वडगाव मावळ – आज दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रविवार या क्रांती दिनी वडगांव मावळ येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न मावळ तालुका कार्यकारिणीची जेष्ठ पत्रकार विजय सुराणा,ऍड संजय पाटील,अमीनखान, श्रीराम कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यावेळी मावळ तालुका अध्यक्ष पदासाठी लोकमतचे वार्ताहर श्री. सचिन ठाकर यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदासाठी – रेखा भेगडे,सचिव प्रा. महादेव वाघमारे,उपाध्यक्ष पदी वाय ए घोडके आणि मनोज दत्तात्रय गवळी,खजिनदार म्हणून संतोष थिटे,पत्रकार परिषद प्रमुख सुभाष भांडे, प्रमुख सल्लागार १)ऍड संजय पाटील २ ) श्रीराम कुमठेकर ३ ) अँड. प्रफुल सोनवणे,तर प्रकल्प प्रमुख म्हणून दत्ता म्हाळसकर आणि गणेश वायकर यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीला विजय सुराणा, प्रा. महादेव वाघमारे,सचिन ठाकुर,सुभाष भांडे,मनोज मोरे,धनंजय नांगरे,अमिन खान, रेखा भेगडे,ऍड.संजय पाटील मयुर सातपुते,महेंद्र ओव्हाळ, अॅड, प्रफुल्ल सोनावणे,संतोष थिटे,सचिन मोरे, सचिन चिपळगावकर, दत्ता म्हाळसकर चंद्रकांत जाशी,रियाज शेख,दिपाली पारसकर,श्रीराम कुमठेकर,ऍड अग्रवाल निलेश विश्वनाथ,गणेश वायकर,शिल्पा येवले,मनोज गवळी,रश्मी शिरस्कर,सुनील म्हस्के,रितेश भोमे बापू बी.पाटील, शकिल बागवान,गणेश भेगडे,अनिष शेख,सुनिल आढाव,राजेंद्र काळोखे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेष्ठ पत्रकार यांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सचिन ठाकर,कार्याध्यक्षा रेखा भेगडे,सचिव प्रा.महादेव वाघमारे,उपाध्यक्ष पदी वाय ए घोडके आणि मनोज दत्तात्रय गवळी,खजिनदार म्हणून संतोष थिटे,पत्रकार परिषद प्रमुख सुभाष भांडे,यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page