विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन नि दिव्यांग बांधवांच्या रोटरी चॅलेंजर्स क्लबच्या समाजपयोगी उपक्रमांचे काळोखेकडून कौतुक



मावळ मराठा न्युज ;तळेगाव,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स व स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून नुकतेच तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल वसतिगृहामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन संपन्न झाले सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अशा आरोग्य शिबिरांची नितांत आवश्यकता असून विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व आरोग्यविषयक सवयी लावणे काळाची गरज आहे आजचे विद्यार्थी देशाचं उद्याचं उज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष,उद्योजक विलास काळोखे यांनी करताना विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले व दिव्यांग बांधवांच्या रोटरी चॅलेंजर्स क्लबच्या समाज उपयोगी उपक्रमांचे काळोखे यांनी कौतुक केले.समाजातील शेतकरी,कामकरी,कष्टकरी, गोरगरीब घटकातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी करणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे म्हणून रोटरी चॅलेंजर्सच्या माध्यमातून वीर सावरकर गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजर्सच्या संस्थापक अध्यक्षा रो.ज्योती राजिवडे यांनी अध्यक्षीय भाषणातून करताना आपला क्लब समाजातील गोरगरीब घटकांसाठी समाज उपयोगी उपक्रम सतत राबवणार असल्याची ग्वाही ज्योती राजिवडे यांनी दिली.स्वातंत्र्यवीर सावरकर या गुरुकुलाची स्थापना ९ वर्षांपूर्वी झाली असून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, विट कामगार, कष्टकरी, आदिवासी इ.घटकातील ४५ विद्यार्थी या गुरुकुलात राहत असून त्यांची राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था गुरुकुलमार्फत केली जाते. विद्यार्थी पालकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही समाजातील दानशूर व्यक्ती या गुरुकुलास मदत करत असतात असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष व रोटरी सिटीचे सेक्रेटरी सुरेश दाभाडे यांनी प्रास्ताविकाद्वारे करताना आरोग्य तपासणी शिबिराचा उद्देश व हेतू कथन केला.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे,माजी अध्यक्ष सुरेश शेंडे,रोटरी चॅलेंजर्सचे क्लब ऑडव्हायझर दिलीप पारेख,रोटरी चॅलेंजर्सचे क्लब ॲडव्हायझर संजय मेहता,माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, उद्योजक भरत राजिवडे, गुरुकुलचे दादा शिरोडकर, उद्योजक सुनील आगळे इ.नी या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉक्टर्स,नर्स व आरोग्य सेविका यांच्या टीमने स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील ४५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप केले. सर्दी खोकला ताप व पावसाळ्यात येणाऱ्या आजारांची तपासणी करून त्यावरील औषधं देण्यात आली आरोग्य केंद्राच्या वतीने गुरुकुलास एक प्रथमोपचार पेटी प्रदान करण्यात आली डॉ.उन्मेश गुट्टे,डॉ.भारती पोळ, डॉ.मोहन महंत,डॉ.अर्पिता परघेवार,डॉ.सुवर्णा गुट्टे, आरोग्य सेविका वैशाली सहाने, विद्या खांदवे,नितीन पवार,स्वाती भेगडे,चंद्रकांत कुलकर्णी इ.नी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. मुक्ता गायकवाड यांनी केले तर आभार गुरुकुलचे व रोटरी सिटीचे डायरेक्टर रो.प्रदीप टेकवडे यांनी केले रोटरी चॅलेंजर्सचे ऑडव्हायझर रो. तानाजीभाऊ मराठे डॉक्टर्स, नर्स व आरोग्य सेविका यांना रोटरी चॅलेंजर्सच्या वतीने समारंभ पूर्वक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक भरत राजिवडे, उपाध्यक्ष संदीप भोसलकर, सेक्रेटरी वासुदेव लखिमले, सचिन दाभाडे,गणेश घाडगे, रवींद्र काळे,रसिकराज गायकवाड,प्रथमेश बनसोडे, मनोज जैन,सुनील बुटिया, सुनिल जाधव,वैशाली काळे व रोटरी चॅलेंजर्सचे सर्व सदस्य, स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाचे सर्व पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.




