श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ येथे आनंद प्रभा सप्ताह, परम पूज्य प्रभाकवरजी म.साब जयंती निमित्त गोरगरिबांना अन्नदान आणि भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा

मावळ मराठा न्युज -लोणावळा,श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मध्ये परमपूज्य श्री सिद्धी सुधाजी म.साब, श्री सुविधीजी म.साब, श्री समिती जी म.साब यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद प्रभा सप्ताह, परमपूज्य प्रभाकवरजी म.साब जयंतीनिमित्त गोरगरिबांना अन्नदान आणि भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा.आनंद सप्ताह मध्ये मौनदिन एकासना दिन, जप तप, प्रश्नमंच, कोण बनेगा बुद्धिवान, भजन स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच यापुढे प्रत्येक अमावस्येला गोरगरिबांना अन्नदान करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली. यावेळेस करण्यात आलेल्या अन्नदानाचे प्रायोजक श्री गिरीश भाई महेंद्रजी पारख परिवार होते. वाटप करताना श्री महेंद्रजी पारख श्री मनोज जी लुकंड, श्री जितेंद्र जी छल्लाणी, श्री कांतीलाल जी भुरट, श्री अमोल जी नहार, श्री अंकित पारख, श्री अनुज पारख,जैन स्थानक मधील सेवक वर्ग उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्य दिन तर अतिशय आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यामध्ये अशा काही असामान्य व्यक्तिमत्त्वांची ओळख समाजाला करून देण्यात आली की त्यामुळे सर्वांचे या असामान्य स्वतंत्र सैनिकांचे चारित्र्य ऐकून डोळे पाणवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा बंबोरी यांनी केले.जैन समाजातील सुनांनी आणि लहान मुलांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. संघाचे अध्यक्ष श्री गिरीश भाई पारख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अशी माहिती संघाच्या जनसंपर्कप्रमुख सो मनीषा बंबोरी यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page