मनशक्ती केंद्र,लोणावळा यांच्या वतीने पांगोळी येथे मेडिकल कॅम्प संपन्न



मावळ मराठा न्युज – लोणावळा, मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने दिनांक २० नोव्हेंबर रोजी दिंडी आली होती त्यातील सर्व भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मनशक्ती चे डॉ सुहास गोसावी शांती प्रभा आणि आदी सेवेकरी उपस्थित होते.दिंडीचे आयोजन पागोळी गावचे उद्योजक सचिन बोके आणि मित्र परिवार आणि गुरु परिवार लोणावळा यांच्या वतीने करण्यात आले. यावेळेस सर्व बोके कुटुंब आणि पागोळी गावचे ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते. गुरु परिवार तुर्फे उमेश खंडेलवाल,निलेश लोखंडे,शाम साळी आणि खंडेलवाल मेडिकल चे मालक नंदाकिशोर खंडेलवाल उपस्थित होते.




