आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा आणि श्री गजानन आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मावळ मराठा न्युज :- मावळ,आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा आणि श्री गजानन आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर दि.२९ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी १० ते ५ या वेळेत चार भुजा निवास परंदवडी मावळ येथे आयोजित करण्यात आला होता.शिबिराला डॉ. श्री मनोज भिवटे. कु. मयुरी ताई बोत्रे. सौ.अलका ताई पापळ सरपंच परंदवडी. सौ. नलिनी ताई गायकवाड मा. सरपंच सोमाटणे. श्री एस. एस.अनिलराव यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले . शिबिराला १५० लोकांनी आपले नेत्र तपासणी केली या शिबिरात आय ड्रोप व चष्मे मोफत देण्यात आले. या शिबिराला श्री दिलीप भाई देवडा (श्री महादेव नर्सरी ) श्री सोमनाथ पाटील ( राधे वल्लभ नर्सरी ) न्यु ग्रिन फार्म परंदवडी. श्री मुकेश परमार श्री अनुप गायकवाड. श्री बापु महाजन श्री शुभम पापळ श्री रंगाराम दालाजी चौधरी. श्री मदन दिक्षित. सौ . रोहिणी दिक्षित. सौ. शैला ताई बोत्रे. श्री हफीज शेख .व आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन सदस्य या सर्वांच्या अनमोल सहकार्याने शिबिर संपन्न झाला

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page