लोणावळ्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अहिल्या रत्न पुरस्कार श्रीमती नंदा तांदळे यांना तर सामाजिक क्षेत्रातील सौ कल्पना झोरे यांना प्रदान







मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळा नगरपालिका शिक्षण विभागातील शाळा क्रमांक ६च्या मुख्याध्यापिका श्रीमती नंदा विजय तांदळे यांना नुकताच अहिल्या रत्न पुरस्कार मिळाला. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक व आरोग्य, विभागातील कर्तुत्ववान ३०० महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा दिनांक ७/९/२०२५ रोजी साहित्य मंदिर सभागृह वाशी नवी मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्रीराम हरी रुपनर (मा. सदस्य विधान परिषद) सन्माननीय श्री विश्वास मोठे (उप आयुक्त मुंबई महानगरपालिका) माननीय श्री सचिन मोटे (आयकर आयुक्त मुंबई) माननीय श्री संजय वाघमोडे (विभागीय वन अधिकारी दक्षता कोल्हापूर) माननीय श्री उल्हास वाघमोडे साहेब (भूमी अभिलेख अधिकारी मुंबई) या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सन्माननीय श्री प्रवीण काकडे साहेब (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली संस्थापक अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला महाराष्ट्रातील ३०० महिलांच्या पैकी आपल्या लोणावळ्यातून सामाजिक क्षेत्रात कर्तृत्ववान काम केल्याबद्दल सौ कल्पना झोरे यांना पुरस्कार मिळाला तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीमती नंदा विजय तांदळे यांना अहिल्या रत्न पुरस्कार देण्यात आला.मावळ मराठा न्यूज परिवार कडून त्यांचे मनापासून अभिनंदन.



