लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश वायकर तर कार्याध्यक्षपदी भाऊ म्हाळसकर यांची बिनविरोध निवड

मावळ मराठा न्युज -लोणावळा,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी आपलं मावळ चे मुख्यसंपादक गणेश वायकर यांची तर कार्याध्यक्ष पदी दैनिक सकाळ समूहाचे लोणावळा शहराचे वार्ताहर भाऊ म्हाळस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीनकार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लोणावळ्यातील जेष्ठ पत्रकार आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जोशी,संस्थापक सचिव ऍड संजय पाटील पत्रकार श्रीराम कुमठेकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २०२६ आणि २०२७ साठी ही कार्यकारिणी कारभार पाहणार आहे. यात लोणावळा शहर पत्रकार संघाची कार्यकारिणी अध्यक्ष – गणेश वायकर,कार्याध्यक्ष – भाऊ म्हाळसकर,दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहर बापू पाटील आणि साप्ताहिक अष्टदिशा चे संपादक रियाज भाई शेख यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सतर्क महाराष्ट्र च्या संपादिका यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. एम एन न्युजच्या प्रतिनिधी रश्मी शिरस्कर यांची सचिवपदी,खजिनदारपदी – एस एम न्युज चे सुनील म्हस्के यांची तर सहसचिव पदी मछिंद्र मांडेकर यांची तर सह खजिनदार पदी साप्ताहिक बुलंद मावळचे संपादक मनोज गवळी यांची निवड करण्यात आली. साप्ताहिक क्रांती सम्राटच्या संपादिका दीपाली पारस्कर,दैनिक मावळ परिसरचे मनोज मोरे,प्रफुल सोनावणे,अष्टदिशाचे प्रतिनिधी शकील बागवान,साप्ताहिक मावळ नागरिकचे रितेश भोमे, आपलं मावळच्या प्रतिनिधी शिल्पा येवले यांची सदस्य पदी तर चंद्रकांत जोशी,ऍड संजय पाटील,श्रीराम कुमठेकर यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली. २००१ साली लोणावळा शहर पत्रकार संघाची स्थापना झाली होती.त्यावेळी चंद्रकांत जोशी पहिले अध्यक्ष तर संजय पाटील यांची सचिव पदी निवड झाली होती.त्यावेळी लोणावळा शहरात जवळपास ८ ते ९ साप्ताहिके अस्तित्वात होती. भांडवलदार दैनिकाचे मालक सक्षम असल्याने शहरातील छोटया साप्ताहिक च्या संपादकांनी स्वरक्षणा साठी एकजुटीने २००१ साली लोणावळा शहर पत्रकार संघ स्थापन केला होता. शहरात विधायक कामासाठी अग्रेसर असणारा संघ यापुढील काळात ही तसाच कार्यरत राहील अशी ग्वाही अध्यक्ष् गणेश वायकर यांनी दिली आहे.मावळ तालुक्यात पाकीटमार पत्रकार यांचा सुळसुळाट वाढला असून पत्रकारिता है काहींचा पैसा कामावण्याचा धंदा बनला आहे. त्याला लोणावळा शहर पत्रकार संघाचा विरोधक असणार असल्याचे गणेश वायकर यांनी सांगितले. नवनिर्वाचित कार्यकारणीला मावळ मराठा परिवाराच्या वतीने हार्दीक शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page