तळेगाव दाभाडे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी गणेशोत्सव पूर्वी करावी – अरुण माने






मावळ मराठान्युज- तळेगाव दाभाडे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी करण्याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मा. नगरसेवक व माहिती अधिकार मंच चे अरुण माने यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.तळेगाव दाभाडे शहरातील विविध प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सदर खड्डे सध्या अत्यंत धोकादायक झाले असून, पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे, त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्याना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खड्यांमधून वाहने जात असताना साचलेले पाणी पादचारी व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर उडत आहे, तसेच अनेक ठिकाणी वाहनांची चाके खड्डूयांमध्ये अडकून छोटे-मोठे अपघात घडत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.येत्या सष्टेंबर महिन्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या काळात शहरातील रस्त्यांवर भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तळेगाव दाभाडे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करून धोकादायक खड्डे तातडीने व गुणवतापूर्ण डांबरीकरण करून बुजविण्यात यावेत.अशी मागणी माने यांनी निवेदनद्वारे केली आहे.त्यात केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता खड्डे पुन्हा पडणार नाहीत अशा पद्धतीने दर्जेदार काम करण्यात यावे आणि संबधित ठेकेदारांच्या कामांची नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गुणवता तपासावी.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्यांची कारवाई तातडीतडीने करण्यात यावी.अशी आग्रही मागणी अरुण माने यांनी केली आहे.



