उद्या ५ मार्च ला लोणावळा शहर टपरी,पथारी, हातगाडी धारकांचा लोणावळा नगरपरिषदेवर धडक निषेध मोर्चा



मावळ मराठा न्युज – लोणावळा नगरपरिषदेवर माननीय आमदार श्री सुनील अण्णा शेळके व सर्व पक्षीय अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर टपरी,पथारी,हातगाडी धारकांचा धडक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.सोमवार दिनांक ३ .३ .२०२५ रोजी मावळचे आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांची लोणावळा शहर टपरी पथारी हातगाडी धारकव सर्व पक्षीय अध्यक्ष, नेते व पदाधिकारी यांची आढावा बैठक संचेती लाॅन या ठिकाणी झाली या मध्ये मार्गदर्शन करीत मा आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांनी सांगितले की जुन्या व नव्या टपरी धारकांच्या याद्या तयार करून माझ्याकडे पुढील एक* *महिन्याच्या आत द्याव्यात कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिकांचे हाल होउ देणार नाही महिनाभरात कोणतीही अतिक्रमण कारवाई होणार नाही व होऊ देणार नाही तसे आदेश लोनप मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांना दिले आहेत तरी असे आदेश दिले असताना मा मुख्याधिकारी यांनी ३ .३ .२०२५ रोजी अतिक्रमण कारवाई दि.५ .३ .२०२५ रोजी सकाळपासून २०१३ नंतरच्या टपर्या स्वतः काढुन टाकायचे आदेश काढले आहेत किंवा न काढल्यास लोनप कारवाई करणार आहे तरी या वारंवार होत असलेल्या कारवाई रोखण्यासाठी व आमदार सुनीलशेळके यांचा हि शब्द न ठेवता लोनप मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी पञक काढून अवमान केला आहे त्यांचा तिव्र निषेध करण्यासाठी आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली सर्व टपरी पथारी हातगाडी धारक व सर्व पक्षीय अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह बुधवार दिनांक ५ मार्च ३०२५ रोजी सकाळी १० वा मॅकडोनाल्ड हाॅटेल माॅल , मावळा पुतळा जवळ, लोणावळा या ठिकाणाहून प्रचंड संख्येने लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आपण सर्व आपले व्यवसाय बंद ठेवून सहकुटुंब सहपरिवार आपल्या न्याय्य हक्कांसाठी सामिल व्हायचे आहे असे आवाहन टपरी पथरी हातगाडी संघटनेचे अध्यक्ष श्री वसंतराव काळोखे पाटील,कार्याध्यक्ष श्री रमेश म्हाळस्कर,सचिव श्री गणेश चव्हाण,सर्व पदाधिकारी व सदस्य,कार्यकर्ते. सर्व राजकीय पक्ष अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते सल्लागार व मार्गदर्शक यांचे कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.




