ॲड चेतन औरंगे यांचा सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी भारतीय पत्रकार संघ कडून गौरव

मावळ मराठा न्यूज,पुणे:- भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथील रविराज हॉटेल मेअर हॉल,भांडारकर रोड ,डेक्कन पुणे येथे गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमानिमित्त पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. लोणावळा येथील ॲड चेतन औरंगे यांचा सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतीय पत्रकार संघ लिगल विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.विक्रमकुमार सेन यांच्या शुभहस्ते लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲड चेतन औरंगे यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ॲड कैलास पठारे पाटील,उपाध्यक्ष मा.ॲड पांडुरंग ढोरे पाटील,सचिव मा.ॲड योगेश तुपे पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील संघटनेत विविध क्षेत्रातील सुमारे ७४००० सदस्य आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page