श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी सोहळा विविध उपक्रम राबवून संपन्न







मावळ मराठा न्युज – लोणावळा,११ ऑगस्ट रोजी महिला मंडळ हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याकाळी सर्व सभासद व पदाधिकारी यांनी महात्मा फुले भाजी मार्केट जवळ असणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर नवमी भजनी मंडळाच्या वतीने प्रवचन व भजन सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीप प्रज्वलन करण्यात आले. सभासदाच्या मुलामुलींचा गुण गौरव करून बक्षीस समारंभ संपन्न झाला. सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. अध्यक्ष भगवान लेंडघर, उपाध्यक्ष दत्तात्रेय जाधव, सरचिटणीस व्ही बी वाघुले सर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



