टेल्कोकॉलनी तळेगाव स्टेशन- आई तुळजाभवानी प्रतिष्ठान आयोजित गायन,वादन,भोंडले गरबा नृत्य आणि रोजच्या महाआरतीने नवरात्रोत्सव संपन्न

मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव , प्रतिष्ठानच्या सहाव्या माळेच्या निमित्ताने प्रतिष्ठानने महाआरतीला तळेगावचे ज्येष्ठ डॉक्टर शालिग्राम भंडारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. महाआरतीचा प्रसन्न पवित्र समारंभ संपन्न झाल्यावर डॉक्टर भंडारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला . आपले प्रतिष्ठान हे गेले अनेक वर्षहोम ,हवन,भोंडले,गायन ,वादन, भजन, कीर्तन,गरबा नृत्य असे विविध संस्कृती जोपासणारे उपक्रम आयोजित करीत आलेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीला आपले प्रतिष्ठान हे संस्काराने श्रीमंत आणि समृद्ध करीत आहेत यात मला यत्किंचितही शंका नाही. आजची सामाजिक परिस्थिती अशी आहे की किण रावणरी बाहे काटू? किण लंकामे आग लगाऊ? घर घर लंका,घर घर रावण इतने राम कहासे लावू ? जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो, तत्त्वांना ग्लानी येते , नीतीचा ऱ्हास होतो आणि माणसाचा पशु होतो तेव्हा, समाजाला सावरणारा कुठेतरी राम जन्मावा लागतो. त्याच्या पावलांनी तयार होणारी वाट लोक जीवनाला नव्या जाणिवांची पहाट घेऊन येते. संस्काराच्या माध्यमातून आसा राम आपल्याला प्रत्येक घराघरात तयार करायचा आहे, असे आरतीस उपस्थित असलेल्या माता भगिनींना डॉक्टरांनी संबोधित केले. डॉक्टरांबरोबर प्रसिद्ध निवेदक अनिलजी धर्माधिकारी हेही महाआरतीस उपस्थित होते.महाआरती नंतर डॉक्टरांशी चर्चा करताना प्रतिष्ठानचे सक्रिय कार्यकर्ते रोटेरियन भगवान शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या २६ वर्षाच्या यशस्वी प्रवासाची माहिती दिली .आई तुळजाभवानी मंदिर १९९७ साली स्थापना झाले. गेली २६ वर्षे नवरात्र उत्सव टेल्को कॉलनीत सातत्याने चालू आहे. परिसरात १५० कुटुंबांच वास्तव्य आहे,या कालावधीत पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक, घटस्थापना, सकाळी आरती, सायंकाळी ७ वाजता महाआरती पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांचे हस्ते,आरतीनंतर भोंडला,अष्टमीला होम, दसऱ्याला सीमोल्लंघन व पारंपरिक पद्धतीने सोनं देऊन भेटण्याचा कार्यक्रम, कोजागिरी पौर्णिमेला दुपारी महाप्रसाद. या प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे, कुणाकडेही देणगी मागितली जात नाही. प्रतिष्ठानकडून नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा, व्याख्याने इ.कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. हे संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यास खास विशेष परिश्रम विद्यमान अध्यक्ष जय दाभाडे, उपअध्यक्ष प्रकाश घुले, श्रीमान निरंजन फलके, श्री अमोल महाडिक मार्गदर्शक श्री भगवान शिंदेसर श्री आशिष पालव, श्रीमान बाळासाहेब घुले, निवेदक निलेश फलके, श्रीमान अशोक आरते, श्रीमान शामराव चिटणीस श्री दुरुगकर काका, श्रीमान अरूप सामंता इ.सह सर्व काॅलनीतील ज्येष्ठ नागरिक,युवा. मंडळी, महिला भगिनी नेहमीच उत्साहाने सहभागी असतात.म्हणूनच प्रतिष्ठान पंचक्रोशीत एक आदर्श प्रतिष्ठान म्हणून गणले जाते असे शेवटी अत्यंत अभिमानाने भगवान शिंदे यांनी सांगितले .मावळचे आमदार श्री सुनील आण्णा शेळके यांच्या सौजन्याने लकी ड्रॉ व अल्पोपहाराने महाआरतीच्या समारंभाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page