श्रेयस पतसंस्थेच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त सामाजिक बांधिलकीतून नृत्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, व विद्यार्थी गुणगौरव सोहळा







मावळ मराठा न्यूज -नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव या ठिकाणी वार शनिवार दिनांक 22/08/2026 रोजी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश मदने व संचालक मंडळ यांच्या हस्ते 70 गुणवंत विद्यार्थी व स्पर्धेतील 12 विजयी विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश मदने यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की कार्यसम्राट आमदार कै. माननीय लक्ष्मण भाऊ पांडुरंग जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संस्थेने गेल्या तेरा वर्षापासून विद्यार्थी गुणगौरव सोहळा, दुष्काळग्रस्तांना मदत,वारकऱ्यांना जेवण वाटप,ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप,अंध अपंग मुलांना शालेय वस्तूंचे वाटप, जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा,वृक्षरोपण,रक्तदान शिबिरे व महिलांकरिता हळदीकुंकू तसेच या यावर्षी संस्थेने तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सासवड ते पंढरपूर पाणी टँकर सुविधा पुरवली.असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सांगितले. संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त विशेष उपस्थिती म्हणून सौ. पल्लवीताई जगताप नगरसेविका, सदस्य महिला बालकल्याण समिती पिंपरी चिंचवड मनपा, मा. श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ जगताप नगरसेवक, सदस्य विधी समिती पिंपरी चिंचवड मनपा, सूर्यकांत गोफणे अध्यक्ष श्रमजीवी पतसंस्था, श्री अरुण पवार संस्थापक अध्यक्ष विजयराज पतसंस्था,मधुकर त्रिभुवन चेअरमन जनहित पतसंस्था व श्री गणेश ढोरे भाजपा मंडल अधिकारी सांगवी हे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सारिका कुलकर्णी यांनी मानले व सभा संपन्न झाली असे जाहीर केले.



