लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटी लिमिटेड लोणावळा शाखेचा 7 वा वर्धापन दिन 12 व 13 मे रोजी उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह बँक सोसायटी लिमिटेड लोणावळा शाखा यांचा 7 या वर्धापन दिन 12 व 13 मे रोजी साजरा करण्यात आला. 2026 रोजी वर्धापन दिनानिमित्त गॅलेक्सी हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले गेले होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत शाखाधिकारी श्री सूर्यकांत लोंढे यांनी केले. या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सिंधुताई जाधव व आयसीआयसीआय बँक लोणावळा शाखेचे शाखाधिकारी श्री दीपक उगले साहेब उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.तसेच श्री सचिन झगडे साहेब( मॅनेजर, पुणे मार्केटिंग विभाग) यांनी प्रमुख पाहुणे सिंधुताई जाधव तसेच श्री.दीपक ओगले व श्री सूर्यकांत सातपुते यांना पुष्पगुच्छ व प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू लिखित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या शिबिरास गॅलेक्सी हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉक्टर निरू चौधरी, वैद्यकीय अधिकारी विजय गायकवाड आणि सहाय्यक राजू शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सेवेचा लोणावळ्यातील बहुतांश नागरिकांनी आपली मोफत नेत्र तपासणी करून लाभ घेतला. समृद्धी निकोडे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.या संपूर्ण कार्यक्रमासाठी दामिनी थरकुडे ,यश लोहिरे, हेमंत लोहकरे व यश पुजारी यांनी उत्कृष्टरित्या नियोजन करून उपक्रम यशस्वी केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page