उपमुख्यमंत्री ना. मा सुनेत्रा अजित पवार वहिनीसाहेब यांचे हस्ते ‘मधुकुंज’ प्रकाशित







मावळ मराठा न्युज – पुणे,डेक्कन जिमखाना, पुणे – बालगंधर्व रंगमंदिर येथे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री ना. व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष मा सुनेत्रा अजित पवार वहिनी साहेब यांचे हस्ते शामला पंडित (दीक्षित ) यांचे १८ वे पुस्तक ‘मधुकुंज’ प्रकाशित झाले .कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित ) यांनी ८ मार्च २०१६ पासून आपला लेखन प्रवास सुरू केला.हे १८ वे ‘मधुकुंज’ पुस्तक सचित्र , रंगित कवितासंग्रह आहे . “मधुकुंज”साठी उपमुख्यमंत्री ना. मा. सुनेत्रा अजित पवार वहिनी साहेब यांचे शुभेच्छा पत्र लाभले आहे . जेष्ठ साहित्यिक मा. बबन पोतदार (ग्रामीण कथाकार) यांनी सुंदर आशयघन, प्रासादिक, प्रस्तावना दिली आहे . श्री दत्तात्रय अत्रे (राजज्योतिषी, लेखक), श्री. कल्याण पानगे (माजी शिक्षणाधिकारी), सौ. शारदा पानगे, (अध्यापिका, लेखिका, कवयित्री) कविता खुटवड (अध्यापिका श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी) सुंदर प्रोत्साहनपर शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत ! मधुकुंज संग्रहामध्ये विविध काव्यप्रकार समाविष्ट झालेले आहेत .सौ .सोनाली दिपक मोरे यांनी लेआउट केलेला आहे . श्री .दिपक मोरे सर यांनी पुस्तक बांधणी उत्कृष्ट केली.कु. प्रणाली पंडित, प्रणाली प्रकाशन , पुणे यांचे मार्फत पुस्तक तयार झाले . श्री दराडे यांनी सुंदर मुखपृष्ठ मलपृष्ठ करून पुस्तक तयार केले आहे .या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदिप कदम खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, अनिल देवकाते , सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, सचिव अनिल जाचक उपस्थित होते. संस्थेच्या शाखांतील प्राचार्य ,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , अध्यापक वृंद , विद्यार्थी , पालक उपस्थित होते .



