तीन फूट जागा लोणावळा नगरपरिषदेने उपलब्ध करावी म्हणजे रुग्णालयाचे काम थांबणार नाही- आमदार सुनील शेळके


मावळ मराठा न्युज :-लोणावळा :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला कोणाचाही विरोध नाही; सूर्यकांत वाघमारे समाजाची दिशाभूल करत भावनिक राजकारण करत आहेत अशी टिका मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.खरंतर या कामाचे ठेकेदार वाघमारे हेच आहेत, त्यांनी काम करताना या तांत्रिक बाबीचा विचार करायला हवा होता. समाजाने ही बाब देखील ध्यानात घ्यायला हवी. समाजाला भावनिक आवाहन करत, समाज जमवत, वाघमारे हेच जातीय तणाव निर्माण करत असून माझ्यावर खापर फोडत आहे. असे हि शेळके यांनी सांगितले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला कोणाचाही विरोध नाही. जी सिमभिंत रुग्णालयाच्या बाजूला बांधण्यात आली आहे. ती भिंत बांधताना भिंत व रुग्णालय यामध्ये २० फुटाचे अंतर ठेवायला हवे आहे. ते ठेवले न गेल्याने त्यावर मा. उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अग्निशमन विभाग व सिव्हिल सर्जन यांनी देखील हरकत उपस्थित केली आहे. तोच मुद्दा मी मांडला आहे. ३ फूट जागेचा विषय आहे. ती तीन फूट जागा लोणावळा नगरपरिषदेने उपलब्ध करावी जेणेकरून रुग्णालयाचे काम थांबणार नाही ही माझी भूमिका असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. काल पर्यंत सूर्यकांत वाघमारे आमदारांचा स्मारकाला विरोध आहे असे सांगत होते आज ते सिमा भिंतीला विरोध आहे असे सांगत आहे यावरूनच यामध्ये काहीतरी मेक आहे हे दिसून येत आहे. रुग्णालयाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे तर स्मारकाचे काम मागील दीड वर्षापासून सुरू आहे. लोणावळा नगरपरिषदेने या कामाचे नकाशे मंजूर करताना रुग्णालयापासून २० फूट अंतर सोडून काम करायला हवे होते. तसेच भविष्याचा विचार करून परवानग्या द्यायला हव्या होत्या. मात्र तसे न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर आता लोणावळा नगरपरिषदेने तोडगा काढावा व रुग्णालयाचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून लोणावळा शहर व परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत, ते कोण्या एका समाजाचे नाही, त्यांच्या स्मारकाच्या कामाला विरोध करण्याचा प्रश्नच येथे उपस्थित होत नाही. मात्र केवळ समाजाला पुढे करायचे व माझ्या विरोधात भडकावून द्यायचे हे काम सुरू आहे. जे काम करताना चुकले आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. उद्या भविष्यात स्मारकाला देखील जागेची तीच अडचण येणार आहे. लोणावळ्यात उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा हा लोणावळा शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा होणार आहे. ते लवकरात लवकर सुरू होण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. सर्वांनी याचा विचार करावा व कोणतेही राजकारण न करता रुग्णालय व स्मारक ही दोन्ही कामे पूर्ण होण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आमदार शेळके यांनी सांगितले.




