लोणावळ्यात वंदे मातरम या स्वातंत्र्याच्या मंत्र गीताला १५० वर्ष पूर्ण,त्यामुळे भव्य कार्यक्रमाचे आयोजन








मावळ मराठा न्युज – लोणावळा, लोणावळ्यात, “वंदे मातरम” या गीताला १५० वर्षें पूर्ण होत आहे या निमित्त दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात नुकतीच हॉटेल चंद्रलोक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आयोजक संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक,नगरपरिषद समोर लोणावळा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला व्याख्याते श्री शिरिष पटवर्धन,यांचे वंदेमातरम गीताचा इतिहास सांगणारे व्याख्यान,संपुर्ण वंदे मातरम समुह गायन,यानंतर सहभागी शाळांचा सन्मान,आभार,राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. लोणावळा शहरातील सर्व शाळांमधील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित समूह गायन होणार आहे .हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर,शिवदुर्ग मित्र लोणावळा,मावळ वार्ता फाउंडेशन,शिवसेवा प्रतिष्ठान,लोणावळा नगरपालिका,क्रांतिवीर लहुजी वस्ताद ITI लोणावळा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ ते ७ हजार विद्यार्थी यात सहभागी होणार असून सामूहिक गायन करून एक मोठं रेकॉर्ड लोणावळ्यातील या कार्यक्रमाने होणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या वैशिष्टपूर्ण कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे.



