अज्ञात मारेकऱ्याचा हल्ल्यात शिरगावचा सरपंच प्रवीण गोपाळे यांचा निर्घृण खून

मावळ मराठा न्यूज,मावळ तालुक्यातील शिरगाव येथे एक भयंकर घटना समोर आली आहे. तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सरपंच प्रवीण गोपाळे यांना तातडीने उपचारासाठी सोमटने फाटा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, चेहऱ्यावर आणि छातीवर कोयत्याचे गंभीर वार असल्याने उपचारापूर्वीच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण गोपाळे असं हत्या झालेल्या सरपंचाच नाव आहे. शनिवारी १ एप्रिल रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनीच्या प्लॉटिंगच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा शिरगाव पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गोपाळे हे शिरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते शिरगाव मधील साईबाबा मंदिरासमोर उभे असताना अचानक तीन अज्ञात आरोपी हातात कोयता घेऊन आले.काही कळण्याच्या आतच या तीन आरोपींनी हातातील कोयत्याने सरपंच प्रवीण गोपाळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील लोक येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page