संघर्ष योद्धा मनोज पाटील यांचा पदयात्रे चा २४ तारखेला लोणावळ्याला मुक्काम,त्यासंदर्भात नियोजन बैठक संपन्न

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,नुकतीच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारी पासून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची पदयात्रा आंतरवली सराटी पासून मुंबईच्या दिशेने निघणारआहे.याकरिता वलवण गावातील महादेव मंदिर हॉल येथे नियोजनाच्याबैठकीचे आयोजन करण्यात आले. २४ जानेवारी रोजी ही भव्यदिव्य आणि ऐतिहासिक पदयात्रा लोणावळा परिसरात मुक्कामी येणार आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत,त्यांना ताकद देण्याचे काम आणि पुढील पिढीचे जीवनमान सुखी,आनंदी करण्यासाठी समाज म्हणून प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीने पूर्ण झोकून देण्यासाठी आणि आता नाही तर कधीच नाही या दृष्टीने एक सुवर्ण संधी म्हणून या आंदोलनाकडे पाहिले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला एक उत्तुंग आणि खंबीर नेतृत्व लाभले आहे. ज्याच्या एका हाकेवर लाखो नाही कोट्यावधी समाज बांधव साद घालतात अश्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेले हे आंदोलन आहे. याला पूर्ण शक्तींनीशी म्हणजे तन, मन आणि धनाने साथ देण्याची गरज आहे. ज्यांच्या कडे आर्थिक कुवत नाही तर त्यांनी वेळ द्यायला पाहिजे. २० तारखेला आरंभ होणाऱ्या या पदयात्रेत लाखो सकल मराठा सहभागी होणार आहेत. त्या समाज बांधवांची मुक्कामी आल्यानंतर जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, राहण्याची सोय आणि इतर मूलभूत सुविधा मध्ये वीज, टॉयलेट व इतर अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी मराठा समाज म्हणून लोणावळा शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक सकल मराठा समाज बांधवांची आहे. पदयात्रेत सहभागी होणारया या सर्व समाज बांधवांना एक वेळचे जेवण देण्याकरिता लोणावळा शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक घरामधून किमान २५ चपात्या व शेंगदाण्याची चटणी किंवा तत्सम खाद्य पदार्थ दिवाळीला बनवले जाणारे लाडू चिवडा चकली ह्या सारखे पदार्थ ही जमा संकलित करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. यावेळी अनेक पाण्याचे टँकर, मुक्कामासाठी मोकळी जागा,त्याला लागणारा विद्युत पुरवठा,जेनरेटर, थँडीचे दिवस असल्याने साप पासून बचवासाठी सर्प मित्र,अग्निशमन गाडी,डॉक्टर्स, मुक्कामी असणाऱ्यांचीसंख्या मोठी असल्याने अस्वछता होणार नाही याची दक्षता घेण्याचाही यावेळी चर्चा करण्यात आली. प्रत्येक बांधवानी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, हेवेदावे स्पर्धा बाजूला ठेवून हे शिव धनुष्य उचलण्याचे ठरवले आहे.ही जबाबदारी सोपी नसली तरी एकजुटिने उचलल्यास आणि जबाबदारी वाटून घेतल्यास अवघड ही नाही असेच या आढावा बैठकीत दिसून आले. २८ गावांमधून ही लोणावला मुक्कामी असणाऱ्या लाखो योध्याना रसद पुरवली जाणार आहे.प्रत्येक गावात समन्वयाने ही अवघड जबाबदारी पुर्ण केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची येथे मुक्कामी येणाऱ्या समाजबांधवाला कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कोणत्या कामासाठी कोणाला संपर्क करावा❓ ते नंबर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page