सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमातून सुरक्षित डिजिटल भविष्याचा संकल्प;सायबर जागरूकता दिनी विद्यार्थ्यांना सायबर सजगतेचे धडे

मावळ मराठा न्युज -जळगाव, दि. २ सप्टेंबर २०२६ :डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. सायबर जागरूकता दिवसाच्या निमित्ताने, याच उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने ‘सायबर शिक्षण, सायबर सुरक्षा – Earn and Learn’ उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा संदेश देत सुरक्षित डिजिटल भविष्याचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमात सुरुवातीला सायबर वॉरियर्सच्या Journey Video च्या माध्यमातून त्यांच्या Impact Activity चा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ. प्रो. व्हि. ल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन वैष्णवी पाटील आणि विद्या सोनवणे यांनी केले. शिक्षक समन्वयक प्रा. आर. बी. आमले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.कुलगुरू डॉ. प्रो. व्हि. ल. माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सायबर वॉरियर क्लबच्या अध्यक्षा जान्हवी सपकाळे हिने Presentation सादर करून विद्यार्थ्यांशी सायबर गुन्ह्यांवर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी Cyber Security Quiz Competition घेण्यात आली. प्रथम तीन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमात Banking Fraud, Social Media Fraud, Photo Morphing, Identity Theft आणि Social Engineering यांसारख्या गंभीर विषयांवर सायबर वॉरियर्सनी जनजागृती केली. टीना पाटील, प्रिया भंडारकर, वैष्णवी सैतवाल, प्रजाल मराठे, भाग्यश्री बढे, विद्या सोनवणे, स्नेहल पाटील, तनिषा महाजन आणि वैष्णवी पाटील यांनी Banking Fraud वर आधारित नृत्य सादर केले.राहुल चोपडे, अक्षय पाटील, जान्हवी सपकाळे, विद्या सोनवणे, वैष्णवी पाटील आणि लोकेश पाटील यांनी ‘यमराज’ नाटकातून Social Media Fraud आणि Photo Morphing चे धोके स्पष्ट केले. त्यानंतर जय ठाकूर, अक्षय पाटील, ऋषी भोजणे, टीना पाटील, भावेश पाटील, खुशबू लांबोळे आणि साक्षी पाटील यांनी सायबर जागरूकता नृत्य सादर केले. Identity Theft Fraud बाबतही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती व खबरदारीचे उपाय सांगण्यात आले.Social Engineering या विषयावरील नाटकातून तनिषा महाजन, स्नेहल पाटील, दर्शना चौधरी, वैष्णवी सैतवाल, जय ठाकूर आणि खुशबू लांबोळे यांनी सायबर गुन्हेगारांकडून मानवी विश्वास व भावनांचा गैरफायदा घेऊन होणारी फसवणूक प्रभावीपणे मांडली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सायबर वॉरियर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये Anti-Fraud App डाउनलोड करून घेण्यात आले. त्यामुळे सायबर सुरक्षेची माहिती, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती या तिन्हींचा प्रभावी संगम साधण्यात आला. सायबर जागरूकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी सजगता निर्माण करून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले.आभार प्रदर्शन सायबर वॉरियर टीना पाटील हिने केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page