भांगरवाडी रस्ता,भांगरवाडी -नांगरगाव रेल्वे पुल आणि अस्वछ मटन मार्केट बाबत लोणावळा नगरपरिषदेला काल मर्यादा सह निर्देश


मावळ मराठा न्यूज़, लोणावला:- लोणावळा नगरपालिका मध्ये कोर्ट कमिटी मध्ये लोणावळ्याला शहरातील समस्या व विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गटनेते देविदास कडू, भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, नंदू जोशी, जयप्रकाश परदेशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.यात लोणावळ्यातील नागरिकांना गेल्या ५ महिन्यांपासून त्रस्त करणारा महत्वाचा विषय म्हणजे भांगरवाडी तील मुख्य रस्ता ३१ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश लोणावला नगरपरिषदेला दिले आहेत शिवाय लोनवलेकर नागरिकांना गेल्या १५,२० वर्षात एवढा त्रास झाला नाही एवढा मोठा त्रास झाल्याने सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकावे व संबंधित अधिकाऱ्यांवर कड़क कारवाई व्हावी असं कोर्ट कमिटीने लोणावला नगरपरिषदेला निर्देश देताना दिले आहेत. दूसरा महत्वाचा विषय म्हणजे भांगरवाडी -नांगरगाव रेल्वे पुल ज्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी मुळे तासंतास थाम्बावे लागते या महत्वाच्या नागरी समस्येकडे माजी नगरध्यक्षा सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांनी लक्ष वेधले. त्यावर कोर्ट कमिटिने ३१ मे पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे त्यामुळे तोहि मार्ग मोठा दिलासा देणारा आहे. आणि तीसरा महत्वा चा लोनवलेकरांचा आरोग्या बाबत महत्वाचा विषय म्हणजे अस्वछ मटन मार्केट यात स्लॉटर हाऊस ३१ मार्च २९२४ पर्यन्त पशु वैद्यकीय अधिकारी आणि सुसज्ज असे स्लॉटर हाऊस चालू करण्यात यावे असेही निर्देश कोर्ट कमिटीने लोणावला नगरपरिषदेला दिले आहेत.त्यामुळे लोणावला शहर भाजपने कोर्ट कमिटी लोणावला यांना ९ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या २१ ते २२ विषया बद्द्लच्या नागरी समस्यांच्या बाबत दिलेल्या निवेदनातील आज कोर्ट कमिटिने तीन महत्वाच्या विषयाबद्द्ल ठोस असे निर्देश लोणावला नगरपरिषदेला दिले आहेत त्यामुळे लोनवलाकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.




