श्री डोसनाथ नागरी पतसंस्थेचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

मावळ मराठा न्यूज, तळेगांव, डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक बबनरावजी भेगडे तसेच संस्थेचे आधारस्तंभ चेअरमन संतोष जी भेगडे या उभयतांच्या संकल्पनेतून महाबळेश्वरच्या हिरकणी या अत्याधुनिक रिसॉर्ट मध्ये दिनांक ११ व १२ फेब्रुवारी रोजी डोळसनाथ पतसंस्थेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेचे उद्दिष्ट म्हणजे सर्व संचालक व कर्मचारी व पिग्मी एजंट या सर्वांना नवीन येणाऱ्या कायद्याचा परिचय व्हावा, तसेच संस्थेच्या मार्केटिंग बाबत पुढील ध्येय धोरण आणि दिशा निश्चितीबाबत बँकिंग क्षेत्रातील ज्ञान- अनुभव संपन्न अशा व्याख्यात्यांचं मार्गदर्शन व्हावं हा उद्देश होता! पीपल को बँकेचे महाव्यवस्थापक सदानंदजी दीक्षित,अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे डिजिटल तज्ञ चेअरमन अभिजीत पाटील संस्थेचे सल्लागार डॉक्टर शालिग्राम भंडारी,महेश भाईशहा व्याख्याते सुनील शेटे या सर्वांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून संस्थेचे हे उद्दिष्ट शंभर टक्के यशस्वी केले! संस्थेचे सर्व संचालक- व्यवस्थापक- कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनीही प्रत्येक विषयातील चर्चेत मनापासून भाग घेतला! अनेक प्रश्न विचारून आपलेही समाधान करून घेतले म्हणूनच खऱ्याअर्थाने ही कार्यशाळा यशस्वी झाली! अध्यक्ष राहुल पारगे यांनी- व्याख्याते अभिजीत पाटील यांचे आणि व्याख्याते सदानंद दीक्षित- सुनील शेटे या उभयतांचे उपाध्यक्ष विकास कंद यांनी अतिशय योग्य शब्दात आभार मानलेत! संस्थेचे तरुण तडफदार चेअरमन *श्री संतोषजी भेगडे यांच्या नेतृत्वाखाली- अभ्यासू तितक्याच संवेदनशील व्यवस्थापक श्रीमती तसलीम शिकीलकर ,कर्मयोगी अध्यक्ष श्री राहुल पारगे- उपाध्यक्ष निलेश राक्षे- विकास कंद- सचिव- अतुल राऊत,खजिनदार कौस्तुभ भेगडे आणि कर्मचारी श्री अतुल काकडे यांनी खरोखरच विशेष परिश्रम घेतले, बँकिंग क्षेत्रातील अनुभवसंपन्न श्री महेशशहा- उद्योगात अग्रगणी असलेले संजयजी ओसवाल आणि ज्येष्ठ साहित्यिक,वक्ते डॉ. शालिग्राम भंडारी यां संस्थेच्या सल्लागारांनीही या कार्यशाळेत सक्रिय भाग घेतला! महाबळेश्वरच अल्हाददायक प्रसन्न वातावरण! मनोरंजनातून प्रबोधन! आणि त्यातून परिवर्तन ही विलक्षण अनुभूती कार्यशाळेतील सहभागींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि हीच या संस्था आयोजित कार्यशाळेच्या यशस्वीतेची पावती होती!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page