साइकलिंग क्लब लोणावळाचा अभिनव उपक्रम,भूलेश्वर शंकरमंदिर दर्शन,नशा मुक्ती प्रबोधन आणि भिगवण येथील निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्षी निरक्षण

मावळ मराठा न्युज : लोणावळा,साइकलिंग क्लब लोणावळा नेहमीच सायकल चालवा निरोगी राहा, पर्यावरण स्वच्छ ठेवा हा मंत्र आपल्या कृतितून समाजाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते असते. या वर्षी या कल्ब चे सदस्य भरत भाऊ भरने आणि नितेश कुटे यांच्या संकल्पनेतुन भिगवन पक्षी निरिक्षण स्थळ बघण्याची योजना आखली. दिनाक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० मि. लोणावळा टोल नाका येथुन साइकलिंग क्लब चे सद्स्य निघाले. वाटे मध्ये काही किलोमीटर वर असलेले भूलेश्वर शंकराचे यादव कालीन मंदिर याचा जिर्णोद्धार पेशव्यांच्या काळामध्ये करण्यात आला होता.हे मंदिर अतिशय रेखीव असे मंदिर आहे या मंदिराला सुद्धा सायकलिंग क्लब लोणावळ्याच्या सदस्यांनी दर्शन घेऊन आपला भिगवण प्रवास दुपारी सुरू केला. लोणावळा ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्य साई कार्तिक यांच्या संकल्पनेतून नशा मुक्त समाज याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या परिसरामध्ये आलेल्या भाविकांना भरत भरणे यांनी सायकल चालवण्याचे महत्त्व व कुठलेही व्यसन न करण्याचे आव्हान केले.त्यामुळे आलेले सर्व भक्तगण या सायकलिंग क्लबचे खूप कौतुक करत होते. संध्याकाळी नऊच्या सुमारास सर्व सदस्य भिगवन येथे मुक्कामी पोचले दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी सर्व सदस्य पहाटे पाच वाजताच उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये असलेले पक्षी निरीक्षण केंद्रावरती पोहोचले. त्यांना जगातील विविध भागातून आलेले असंख्य पक्षी आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाले आणि त्यामुळे एक वेगळाच निसर्गाच्या सानिध्यामध्ये पक्षी निरक्षणाचा आनंद मिळाला. या पक्षी निरीक्षण सहलीमध्ये सायकलिंग क्लब लोणावळा चे सदस्य भरत भरणे, नितेश कुटे, विजय येवले, कैलाश कडूसकर, अनिल गावडे, डॉ.प्रवीण लाटणे, सिद्धेश्वर इंगळे, धिरज येळसंगे, डॉ. प्रवीण पंडित, कमल परदेशी,तळेगाव हे सदस्य सहभागी झाले होते.या सहली साठी सिंहगड लोणावळा संकुल संचालक डॉ. एम.एस. गायकवाड यांनी सर्व सायकलिंग क्लब लोणावळा चे अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page