मुळशी भूमीपुत्र नंदकुमार वाळंज यांना आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

मावळ मराठा न्युज – आंबवणे,महाराष्ट्र जर्णालीस्ट फाउंडेशन, BBL मराठी न्यूज नेटवर्क तसेच भारत पब्लिकेशन न्यूज नेटवर्क आयोजित” स्टार आयकॉन अवॉर्ड 2026 चे आयोजन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे मोठया थाटात पुरस्कार वितरण सोहळ्या चे आयोजन करण्यात आले.मा. डॉ.राजीव लोहार व त्यांच्या पब्लिकेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी मा. आमदार भीमराव तापकीर, भुमाता ब्रिगेड च्या सर्वे सर्व्हा मा सौ. तृप्तीताई देसाई समाजसेवक मा. नंदकुमार वाळंज मा. दिलीप बगाडे,मा पियू धनवडे -कोल्हापूरकर मा राणी बबिता मुसळे, मा ह भ प कृष्णा फाटे महाराज,मा ऍड. दिलीप जगताप,मा डॉ सुचिता पाटील,मा अभिजित संकाये पाटील, मा कु साक्षी कळवडेकर,मा मनीषा ताई लोहार व पब्लिकेशन च्या सर्व पदाधिकारी यावेळी सोहळ्यात उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांची महाराष्ट्र भूषण, जीवन गौरव तसेच विविध भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.त्या अगोदर उपस्थित मान्यवरांचा आयोजकांनी पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला.या कार्यक्रमात मुख्य आकर्षण बाल नृत्य अविष्कार चे सादरीकरण केले. या सोहळ्यात मावळ वार्ता फाउंडेशन चे संचालक सचिन पारख, लायन्स क्लब चे अध्यक्ष मा नवीन भुरट, निवृत्त आर टी ओ मा. हरिश्चन्द्र गडसिंग साहेब व मा शेलारभाऊ मुख्याध्यापक
देवरे सर आदी मान्यवर हजर होते.
आंबवणेकर व मुळशी भागातील जेष्ठ समाजसेवक, कोराईगड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज यांचे आजपर्यंत चे समाज हिताचे कार्य व त्यांना मिळालेले विविध जीवन गौरव व इतर विशेष पुरस्कार पाहुण आज मा.वाळंज यांना आज “आदर्श महाराष्ट्र भूषण ” पुरस्कार देण्यात आला.
ह्या पुरस्कार मुळे मा वाळंज ( बाबूजी ) यांचे कार्य अधिकच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे हे सिद्ध झाले. या पुरस्क्रामुळे मा नंदकुमार वाळंज यांच्यावर मावळ मुळशी भागातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुरस्कार प्राप्त मानकरी यांनी आयोजकांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page