मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी लोणावळ्यात मोफत डोळे तपासणी आणि हाडांचा ठिसूळपणा तपसणी शिबीर

मावळ मराठा न्युज – लोणावळा,उद्या दिनांक १५ एप्रिल २०२५ वार मंगळवार रोजी सकाळी १० ते १ यावेळात येथील विरंगुळा केंद्र,लोणावळा येथे रोटरी क्लब ऑफ लोणावळा,जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. डोळे तपासणीत मोती बिंदू शस्त्रक्रिया तळेगाव येथील भाऊसाहेब सरदेसाई चारिटेबल हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहें.यावेळी डॉ खादीजा यांच्या वतीने हाडांचा ठिसूळपणा देखील तपासला जाणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे अध्यक्ष नारायण शरवाळे आणि प्रकल्प प्रमुख नितीन कल्याण यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केले आहे.






