मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके,जिल्हाधिकारी जितेंद्र दुढी,पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप गिल आपण लोणावळेकर यांना वाहतूक कोंडी बद्दल दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?









मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर भाई शेख यांनी मावळ चे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी एक वर्षापूर्वी मारलेली थाप तीन महिने द्या सर्व वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन देऊन लोणावळ्यातील जनतेच्या टाळ्या घेतल्या होत्या आता एका वर्षानंतर देखील पर्यटन वाढी साठी आवश्यक असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही. म्हणजे आमदार सुनील शेळके,जिल्हाधिकारी जितेंद्र दुढी आणि पोलीस अधीक्षक संदीप गिल या तीनही जबाबदार व्यक्तींनी एक वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन म्हणजे फक्त राजकीय फेकाफेकी होती कां? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. याचीच आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष नासिर भाई शेख यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना आपल्या वरिष्ठाकडे सदर बाबीचा पाठपुरावा करून देण्याची आणि संदीप गिल यांना आठवण व्हावी यासाठी आज निवेदन दिले आहे.यावेळी रमेश दळवी, सुधीर कदम, प्रफुल राजपूत, अभय परदेशी, प्रवीण करकेरा उपस्थित होते.



