योग,ध्यान,अध्ययन या त्रिसूत्रींचा जीवनात यशाचे शिखर गाठता येते – बालाजी विठोबा जाधव



मावळ मराठा न्युज-पुणे,मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने काळेवाडी संकुलातील एम एम जुनियर कॉलेज व एम एम माध्यमिक विद्यालयात प्रसिद्ध,नामवंत वक्ते “वक्ता महाराष्ट्रचा आणि भारताचा “श्री. बालाजी विठोबा जाधव सरांचे विद्यार्थ्यांसाठी नुकतेच जाहीर झालेल्या प्रथम ‘जागतिक ध्यान दिवस’ दिनानिमित्त २१ ङिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी जीवनातील विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. योग,ध्यान,अध्ययन या त्रिसूत्रींचा जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी किती महत्त्व आहे हे पटवून दिले.शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहणं खूप महत्त्वाच आहे आणि हे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ध्यान हाच उत्तम पर्याय आहे. मनाची सबलता ,शांती , सुदृढ समाजनिर्मिती ध्याना मुळेच मिळू शकते. भगवान गौतम बुध्द, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल विचारातून मनुष्य जीवनातील ध्यानाचे महत्व विशद केले.जीवनात ध्यान हे महान धन आहे सांगितले. ‘वाचाल तर वाचाल’ सांगून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चांगले सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पुस्तक वाचन किती महत्त्वाचे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तसेच १२ वी च्या विद्यार्थ्यांनाही ‘ङियर एक्साम’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कठीण विषय सुलभ कसा करावा आणि त्याची आवड निर्माण होण्यासाठी साध्या सोप्या टिप्स दिल्या. परीक्षेची भीती कमी करण्यासाठी ध्यानाचा उपयोग कसा करावा हे सांगितले. कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षण अधिकारी श्री काळखैरे सर, प्राचार्य सौ .विद्याराणी वाल्हेकर मॅडम, ज्यूनि. कॉलेजचे विभाग प्रमुख श्री.संदीप सावळे सर, श्री.बालाजी सरांच्या सहकारी डॉ. शुभांगी उमेश सरोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा.प्राचार्या विद्या वाल्हेकर यांच्या परवानगीने प्रा.वर्षा पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सौ.कविता चौधरी यांनी व आभार प्रदर्शन श्री.धनंजय जाधव सरांनी केले.




