एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल मध्ये गीतांजयंती साजरी

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे गीतांजयंती निमित्त भगवद्गीतेचे सामूहिक पठन करण्यात आले. यावेळी १००० विद्यार्थ्यांद्वारे गीतेतील १४ व्या अध्यायाचे पठन करण्यात आले.संस्थेच्या सचिव सौ राधिका भोंडे यांनी विद्यार्थ्यांना गीतेचे जीवनातील महत्व सांगत चौदाव्या अध्यायामधील गुणत्र्ययविभाग संदर्भात तीन गुणांची ओळख करून दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे संस्थेचे सदस्य संजय पुजारी संजीव वीर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले स्मिता इंगळे पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक शशिकला तिकोणे यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता यादव यांनी केले तर सोनाली कामे यांनी उपस्थितांचे आभार मानले.शाळेचे शिक्षक नितीन तिकोणे यांच्यासमवेत एक हजार विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या गीतेतील १४ व्या अध्यायाचे पठण केले. ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे दरवर्षी गीतेतील एका अध्यायाचे विदयार्थ्यांद्वारे वर्षभर पठण केले आते व गीता जयंतीला त्याचे सामुहिक पठण केले जाते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us