दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त;चार जण जेरबंद

मावळ मराठा न्युज सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलरांविरोधात दणकेबाज कारवाई. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जण जेरबंद.लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यासाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दिनांक ०९/०६/२०२४ रोजी सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पो.स्टे हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर, रमेश शिंदे यांचे चाळीत इसम नामे १) दिनेश दीपक शिंदे, वय २४ वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे व २) सौरभ राजेश शिनगारे, वय २४ वर्ष, राहणार कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण ३२ ग्रॅम एमडी पावडर हा अमलीपदार्थ व त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ३ ,२० ,१४६ /- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो कॉ अमोल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट १९८५ चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद कण्यात आला आहे तसेच पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत. तसेच दिनांक १६/०६/२०२४ रोजी श्री कार्तिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी ०६ .२० वाजताचे सुमारास इसम नामे १) शिवाजी मारुती कडू, वय ३५ वर्ष, राहणार कुरवंडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे व २) दिलीप बबन पिंगळे, वय २९ वर्षे, राहणार कुनेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील मारुती सुझुकी ब्रेझ्झा गाडीतून लोणावळा दिशेकडे जात असताना लोणावळा पो.स्टे हद्दीतील रायगड ते कुरवडे रोडवर, ड्रीमलँड बंगल्यासमोर श्री सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह त्यांना थांबवून, पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे सुमारे ४४००० /- रू किमतीचे एकूण ०४ .४० ग्रॅम एम.डी पावडर मिळून आले आहे. सदरचे एम.डी पावडर हे चारचाकी गाडीतून विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांचेकडून चार चाकी वाहनासह एकूण ८ ,९४ ,००० /- रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पो स्टे येथे एन.डी.पी.एस ॲक्ट, १९८५ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा पो.स्टे चे सपोनि लाड हे करत आहेत. संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या सदरच्या दोन्ही कारवायांमध्ये सुमारे ३ ,६० ,००० /- रू. किमतीच्या एकूण ३६ .६० ग्रॅम एम.डी पावडरसह रू. १२ ,१४ ,१४६ /- (अक्षरी – बारा लाख चौदा हजार एकशे सेहचाळीस रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अमोल ननवरे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश ठाकूर, पो.कॉ प्रतीक काळे , पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ सौरभ साबळे, पो.कॉ यश माळवे यांचे पथकाने केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page